जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा केशरी येथे बालिका दिन साजरा


*बालिका दिन उत्साहात*
              जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा केशोरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष पी एन जगझापे मुख्याध्यापक हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गीता बडोले, पवन कोहळे, हेमंत पवनकर, भावना नंदेश्वर हे होते.
          सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक गीता बडोले शिक्षिका यांनी केले. मुख्याध्यापक पी एन जगझापे यांनी अध्यक्षीय पुष्प गुंपले.
      अनेक विद्यार्थिनींनी सावित्रीचा वेश परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
       कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन गुंफेश बिसेन यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post