शिक्षक सभेचा हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न



प्रतिनिधी : दिलीप अहिनवे, मुंबई
परेल, दि. २२ : बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षक सभेचा हळदीकुंकू समारंभ लोअर परेल येथील शिक्षक भवनात शनिवारी उत्साहात संपन्न झाला. महापालिकेच्या विविध विभागातून अनेक महिला कार्यकर्ते व सभासद उपस्थित होते. आमुदा अन्नाराज यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शिक्षक सभेचे सरचिटणीस शरद सिंह, अध्यक्ष सर्जेराव चवरे व कोषाध्यक्ष जयप्रकाश सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच महिला शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. कोरोना कालावधी नंतर प्रथमच शिक्षक सभेचे कार्यकर्ते एकत्र आल्यामुळे उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. कार्यक्रमाची पूर्वतयारी कार्यालयीन चिटणीस प्रकाश राऊत यांनी उत्तमप्रकारे केली होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यसमिती सदस्य सुप्रिया आईर यांनी तर शेवटी सर्वांचे आभार निशा मौर्या यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post