आम्ही हळूहळू काम करतो तुम्ही सुद्धा हळूहळू काम करा..! अन्यथा तुम्हाला एखाद्या प्रकरणात दाबू.


एवढे फास्ट काम करू नका; जिल्ह्यात तुमचा नाव गाजतोय....!
- देसाईगंज तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्याने कार्यतत्पर कर्मचाऱ्यास ठणकावले....

देसाईगंज :- तालुक्यात एक अनोखा व आश्चर्यजनक प्रकार उघडकीस आला असून चक्क एका विभागातील शासकीय कर्मचाऱ्याने त्याच विभागातील कार्यतत्पर कर्मचाऱ्यास 'एवढे फास्ट काम करू नका' कारण जिल्ह्यात काम करण्यामध्ये वरिष्ठांकडे तुमचा नाव गाजत आहे.आम्ही हळूहळू काम करतो तुम्ही सुद्धा हळूहळू काम करा..! अन्यथा तुम्हाला एखाद्या प्रकरणात दाबू.अशी धमकीवजा बोलणी एका कार्यतत्पर कर्मचाऱ्याला दिली असल्याने सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे.
एका संबंधित विभागातील कर्मचाऱ्याने नाव उघड न करता नाव गुपीत ठेवले जात असेल या शर्तीच्या अधीन राहून माहिती दिली आहे.सर्वसामान्य नागरिकांची कामे व कार्यालयीन कामकाजामध्ये सदैव कार्यतत्पर असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यास त्याच विभागातील वेगवेगळ्या ठिकाणी एकाच पदावर कार्यरत असणारे तीन ते चार शासकीय कर्मचारी मिळून मानसिक त्रास देत असल्याने देसाईगंज तालुक्यातून बदली करण्याच्या मार्गावर असल्याची माहिती दिली आहे.
कार्यतत्पर कर्मचारी वरिष्ठांनी सांगितलेली कामे वेळेत पूर्ण करणे,कार्यालयीन कामकाज व्यवस्थितरीत्या पार पाडणे,नागरिकांना उत्कृष्ट सेवा देने,सुट्टीच्या दिवसांतही अपूर्ण असलेली कामे पूर्ण करणे,तक्रारी वा गाऱ्हाणी येऊ न देणे व इतर अशी अनेक कार्ये उत्कृष्टरित्या पार पाडीत असल्याने तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारीही वाहवाही करतात.मात्र याला अपवाद म्हणून काही कर्मचारी पाय ओढण्याचे कामे करतांना सर्व प्रकारणांवरून दिसून येत आहे.कार्यतत्पर कर्मचारी यांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठांकडे पाय खिचणाऱ्यांची नावे सांगीतली तर माझी फसवणूक करू शकतात.या भीतीने वरिष्ठांकडेही तक्रार करू शकत नसल्याचे सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post