राज्याची शैक्षणिक गुणवत्ता खालावली; पाचवीच्या विद्यार्थ्यांना वजाबाकी तर आठवीतील विद्यार्थ्यांना भागाकार येईना.



━━━━━━━━━━━━━
💁🏻‍♂️ कोरोना काळानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना काळानंतर राज्यातील ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती खालावली आहे. पाचवीतील साधारण 80 टक्के विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्येची वजाबाकी आली नाही तर 65 टक्के विद्यार्थ्यांना भागाकाराचे गणित सोडवता आले नाही. प्रथम एज्युकेशन फाउंडेशनने देशभर 'अ‍ॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट' (असर) सर्वेक्षण केले असता ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

🧐 या सर्वक्षणात पायाभूत सुविधांची उपलब्धताही कमी झाली आहे. तसेच पाचवीतील 44 टक्के, तर आठवीतील 24 टक्के विद्यार्थ्यांना दुसरीच्या स्तराचे मराठी वाचन येत नसल्याचे उघड झाले आहे. कोरोनाकाळापूर्वी 2018 मध्येही यासंबंधीचे सर्वेक्षण झाले होते..

▪️ महाराष्ट्रातील सरकारी शाळांमधील पटसंख्या 2018 मध्ये 61.6 टक्क्यांवरून 2022 मध्ये 67.4 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. तर 2018 च्या 37.6 टक्क्यांवरून खाजगी शाळांमध्ये ते 32.1 टक्क्यांवर घसरले आहे. 2022 मध्ये तिसरीच्या वर्गातील सर्वेक्षण केलेल्या मुलांपैकी केवळ 26.6 टक्के मुले दुसरीच्या मजकूर वाचू शकतात. हे प्रमाण 2018 मध्ये 42.1 टक्के आणि 2017 मध्ये 40.6 टक्के होते. 2022 मध्ये दुसरीमधील केवळ 18.7 टक्के मुले मूलभूत वजाबाकी करू शकतात. 2018 मध्ये हे प्रमाण 27.1 टक्के होते. अहवालात सर्वेक्षण केलेल्या उच्च वर्गांसाठी म्हणजे पाचवी आणि आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची स्थिती हीच आहे.

📖 इयत्ता पाचवीतील केवळ 55.5 टक्के मुले दुसरीतील मजकूर वाचू शकतात. तर इयत्ता 8 मधील केवळ 76.1 टक्के मुले इयत्ता दुसरीच्या स्तरावरील मजकूर वाचू शकतात. महामारीनंतर शालेय शिक्षणात डिजिटलायझेशनची नवी लाट असतानाही, ASER अहवालात संगणक असलेल्या शाळांच्या संख्येत घट झाली आहे. तर ज्या शाळांमध्ये मुले संगणक वापरत असल्याचे निरीक्षण केले जाते त्यांची टक्केवारी नाममात्र आहे.

Post a Comment

Previous Post Next Post