सुधरा...नाहीतर पोलिस ठाणे जाळून टाकेन भाजपा आमदाराची पोलिसांना उघड धमकी


सुधरा...नाहीतर पोलिस ठाणे जाळून टाकेन
भाजपा आमदाराची पोलिसांना उघड धमकी
पश्‍चिम बंगाल: पश्‍चिम बंगालमधील भाजपाचे आमदार स्वपन मजुमदार यांनी शनिवारी त्यांच्या बनगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पोलिस ठाणे जाळण्याची धमकी दिली आहे. मजुमदार हे उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील अशोकनगर भागात पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.



रॅलीदरम्यान मजुमदार यांनी आरोप केला की, स्थानिक पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक आणि अधिकारी भाजपा कार्यकर्त्यांना त्रास देतात. तसेच त्यांना अटकदेखील केली जाते. या भागातील टीएमसीच्या कार्यकर्त्यांना मात्र अवैध काम करण्यास ते मुभा देतात. पोलिस अधिकार्‍यांनी आपली वर्तणूक न बदलल्यास पोलिस ठाणे जाळून टाकू अशी उघड-उघड धमकी दिली आहे..

Post a Comment

Previous Post Next Post