ईव्हीएम भंडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रा रोखण्याचे षड्यंत्र




भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना बेकायदेशीर केले डिटेन, कन्याकुमारी पोलिस प्रशासनाविरोधात ३१ जानेवारीला देशभरात जेलभरो

कन्याकुमारी: भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ईव्हीएम भंडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रा पार्ट २ यात्रेला पोलिसांनी नकार दिले नाही मात्र अनुमतीही दिली नाही. तर आमच्या कार्यकर्त्यांना डिटेन करण्याचे काम केले. त्यासंदर्भात आम्ही आवश्यक कायदेशीर लढा लढू. आम्ही सांगितले होते की ५ वाजेपर्यंत पोलिस प्रशासनाने परवानगी दिली नाही तर जेलभरो करण्याचे आवाहन केले होते.



मात्र आमच्या कार्यकर्त्यांना असंविधानिक पद्धतीने डिटेन करण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे मंगळवारी ३१ जानेवारी २०२३ रोजी ११ वाजता सार्‍या देशभरात कन्याकुमारी पोलिस प्रशासनाविरोधात जेलभरो आंदोलन केले जाईल. परिणामी देशभरातील भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सार्‍या देशभरात आंदोलन करावे. या वेळेचा तयारीसाठी उपयोग केला जावा असे आवाहन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संरक्षक वामन मेश्राम यांनी केले आहे.


भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ईव्हीएम भंडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रा पार्ट-२ दि. २६ जानेवारी २०२३ पासून सुरू होणार होती. या यात्रेचा कन्याकुमारी येथून प्रारंभ होणार होता, परंतु या परिवर्तन यात्रेला कन्याकुमारी पोलिस अधिक्षकांनी सायंकाळी ५ वाजेपर्यंत परवानगी दिली नाही. उलट कार्यकर्त्यांना बेकायदेशीर डिटेन करण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे पदाधिकार्‍यांनी पोलिस प्रशासनाचा निषेध केला.


कन्याकुमारीपासून ईव्हीएम भंडाफोड यात्रा सुरू होणार होती. येथील पोलीस प्रशासनाने येथे नको तर पुतळ्याजवळ यात्रा सुरू करा असे सांगितले. तर पुतळ्याजवळ यात्रा सुरू करण्याची परवानगी द्या असे पत्र दिल्यानंतरही पोलिसांनी कुठलाही निर्णय घेतला नाही. त्या पत्राचे रिसिव्ह देण्यासाठीही इन्कार करण्यात आला. म्हणजेच अधिकारी संविधान व कायद्याच्याविरोधात जाऊन काम करत आहेत असा आरोप मेश्राम यांनी केला आहे. आम्ही आमचे मौलिक अधिकार वाचवण्यासाठी जेलमध्ये जाऊ मात्र ते मौलिक अधिकार समाप्त होऊ देणार नाही असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post