बोडधा येथील गावकऱ्यांनी अवैध वृक्षतोड भरलेला ट्रक पकडून वनविभागाच्या केला स्वाधिन


चिमूर तालुक्यात मागील तीन-चार वर्षा पासुन बरेश्या ठिकाणी अवैध वृक्षतोड सुरू होती.परंतु आर्थिक चिरी - मिरी मुळे वनविभाग कडून कार्यवाही होत नव्हती असाही अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु गावकऱ्यांच्या सतर्कतेने आज दि.10/01/23 ला तळोधी वनपरिक्षेत्रात येत असलेल्या मौजा बोडधा येथील गावकराऱ्यानी ट्रक (407) क्रमांक.MH39,AT8991पकडून वनरक्षक संभाजी वाडजे व वनपाल चंद्रकांत रासेकर यांना नाक्या समोर स्वाधिन करण्यात आला.ठेकेदारानी बरेश्या गावकऱ्याचे पैसे न दिल्याने तिव्र नाराजी होती,ठेकेदार नियमित अवैध वृक्षतोड करून नेण्याचे काम करीत होता पण पैसे देण्यास टाळा-टाळ करीत असल्याने गावकऱ्या कडून अश्या प्रकारचा पाऊल उचलण्यात आले.या ट्रक मध्ये सागवान व आळ जातीचे लाकूड होते.ठेकेदार या परीसरात आळजात व सागवान अवैध वृक्षतोड बऱ्याच दिवसा पासुन करीत होता.पण आता पर्यंत वनविभागाकडून कोणती ही कार्यवाही करण्यात आली नाही.माहीती हाती आली असता वनविभागा कडून पंचनामा करून ट्रक जप्ती ची कार्यवाही करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post