मुलींना खरच आजकाल लग्न करायची इच्छा आहेत का ...??



कमी शिक्षण आहे - नको पगार कमी आहे - नको
खेड्यात राहतो - नको स्वतःचे घर नाही - नको
घरात सासू सासरे आहेत - नको
शेत नाही - नको शेती करतो - नको धंदा करतो - नको
फार लांब राहतो - नको फार उंच आहे - नको
चष्मा आहे - नको वयात जास्त अंतर आहे - नको
तो जिथे राहतो तो एरिया बरोबर नाही- नको

सगळ्यालाच नकार देत राहिलात तर मग लग्न कधी करणार संसार कुणाबरोबर करणार 
बरं एवढया सगळ्या कारणांसाठी मुलाला नकार देत असताना मुलींमध्ये अशी कोणती खास गुण वैशिष्ट असतात हे आईवडील सांगू शकतील काय अनेक मुलींना संसार कसा करतात हे माहीत नसतं तडजोड कशी करायची हे माहित नसतं रोजच जेवण सुद्धा बनवता येत नाही काही मुलींना मान्य आहे मुली हुशार आहे

शिकलेल्या आहेत स्वतःच्या पायावर उभ्या आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार जावयाची त्याच्या लठ्ठ पगाराची त्याच्या प्रॉपर्टीची अपेक्षा ठेवणार त्या अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून स्थळांना नकार देत राहणार आणि मुलीचं वय वाढत राहणार या सगळ्यात नुकसान होतंय ते कमी पगार असलेल्या चांगल्या स्वभावाच्या आणि निर्व्यसनी मुलांचं ज्यांना मनापासून जोडीदार हवा असतो पण मुलींच्या त्यांच्या आईवडिलांच्या आणि नातेवाईकांच्या वेलसेटल च्या व्याख्येत ते बसत नाहीत त्यामुळे ते मागे पडतात
मुलाचा लग्नाच्या वेळेस असलेल्या पगारावर मुलीच्या भविष्याची चिंता त्यांच्या पालकांनी करण्यापेक्षा त्या मुलावर विश्वास दाखवून मुलीच त्याच्यासोबत लग्न करून देण गरजेचं आहे कारण त्या मुलाचा जो पगार आता आहे तोच भविष्यात राहणार नाही त्यात दरवर्षी वाढ होत राहणार आहे तसंच लग्न झाल्यावर त्या मुलाला पण त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, भरारी घेण्यासाठी नवीन उत्साह उमेद, बळ मिळणार आहे आणि पगार चांगला आहे म्हणजे मुलगी सुखी राहील हा एक गैरसमज आहे, भविष्यात काय होईल हे कोणालाच माहिती नसतं त्यामुळे राजाचा रंक आणि रंकाचा राजा होऊ शकतो

हल्ली लग्न म्हणजे मुलामुलींपेक्षा त्यांच्या आईवडिलांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी स्टेटस चा विषय झालेला आहे.
माझा जावई डॉक्टर, इंजिनीअर MBA, C A MCA आहे हे सांगण्यात एवढं लाखाचं पॅकेज आहे हे सांगण्यात पालकांना मोठेपणा वाटतं आहे आणि तसं स्थळ मिळावं यासाठी प्रत्येक मुलीचा मुलीच्या आईवडिलांचा आणि नातेवाईकांचा प्रयत्न असतो पण सर्वांनीच अशा अपेक्षा ठेवल्या तर बाकी मुलांनी करायचं काय त्यांची लग्न कशी होणार हा प्रश्नच आहे जेव्हापासून लग्नात माणसापेक्षा शिक्षण पैसा प्रॉपर्टी याला जास्त महत्व आलंय तेव्हापासून नवरा बायको मध्ये भांडणाचं आणि घटस्फोट होण्याचं प्रमाणही वाढलंय हे सत्य विसरून चालणार नाही लग्नात भौतिक सुखांपेक्षा मानसिक सुखाची आधाराची, समजूतदार पणाची जास्त गरज असते
पुढच्या जन्मात मनुष्य देह मिळेल की नाही माहिती नाही स्वर्गातून भगवंत नेहमी तथास्तु म्हणत असतो 
आणि आपण सगळ्याच गोष्टीत नकारात्मकता ठेवून या जन्मातला सगळा अर्थच संपवून टाकतोय

आईवडिलांनी आपल्या मुलाचा / मुलीचा सुखाचा विचार जरूर करावा,
पण तो करताना त्यांच्या वाढत जाणाऱ्या वयाचं आणि निघून चाललेल्या वेळेचं भानही आईवडिलांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी ठेवायला हवं कुठेतरी थांबायला हवं आणि अपेक्षांवर अडून न बसता तडजोड करून पुढे जायला हवं कारण अपेक्षा या कधीच न संपणाऱ्या असतात.....💞.......💞

Post a Comment

Previous Post Next Post