मनुष्य इंगळी अति दारूण, चोरीची सवय जात नाही!

 शिवसेनेच्या राजकीय चोरांना अतिरिक्त बेहिशोबी मालमत्ता बाळगल्या कारणे भाजपने इडी ची बेडी दाखवली आहे.म्हणून जेलच्या भीतीने ही माणसे भाजपला शरण गेलीत.म्हणून इतकी लाचार झाली कि ,जागा वगैरे काही नको, फक्त जेलमध्ये टाकू नका.म्हणजे ,पाठीवर मारा,पोटावर नका मारू.असे कोण म्हणतो.चोर!या चोरांचे, ठाकरेंशी ना प्रेम ना वैर!या चोरांचे भाजपशी ना प्रेम न वैर! यांचे प्रेम फक्त पैशांवर आहे.ते तर कमवले.पण जेलची भीती सुद्धा आहे.
भाजप इडी लावताना दुजा भाव जरी करीत असले तरी मान्य.म्हणे,भाजपच्या चोरांना इडी ची बेडी घालत नाही.फक्त इतर पक्षांच्या चोरांना इडीची बेडी घालतात.हे खरे असले तरीही, स्वताच्या पक्षासाठी कि असेना,स्वताच्या सत्तेसाठी कि असेना,पण इडी ची कारवाई करते,हे सुद्धा खूप चांगले आहे.इडीची खूप गरज होती.खूप गरज आहे.मंत्री खूप मातून गेले होते.यांना कांग्रेस का लगाम लावत नव्हती?हेच चुकीचे होते.कांग्रेसने राजकीय चोरांना बेडी घालण्याऐवजी आण्णा हजारे,रामदेव बाबा यांना बेडी घातली.ही माणसे काय, जंतरमंतर वर सार्वजनिक ठिकाणी दारू,बीडी पीत होते का?ही माणसे कोणा बाईवर लाईन मारीत होते का? ही माणसे कमी कपड्यात फोटो चित्रण करीत होती का? यांच्यामुळे एखाद्या बाईने आत्महत्या केली होती का?या माणसांनी रस्ता बांधकाम निधीतून कमीशन मागितले होते का? यांचे काही दारूचे दुकान होते का ?यांच्या दुकानात बेहिशोबी माल होता का? तरीही कांग्रेस ने यांना अटक केली.मला वाटते, कांग्रेस नेत्यांची बुद्धी गहाण ठेवली होती किंवा मेंदूला उदळी लागली होती. राजकिय चोरांना इडी ची भीती असणे आवश्यक आहेच.हे सांगायला महात्मा गांधी येतील का?
   जर एक चोर चोरी करून चालला आणि पोलिसाने अडवले,दोन कानफटीत लावल्या आणि खिशात हात घालून चोरीचे पैसे काढून घेतले तर बिघडले कुठे?ते पैसे पोलिस जरी खाऊन गेला तरी चालते पण चोराला भीती तर घातली.तसे भाजपने कांग्रेसचे,शिवसेनेचे चोर आमदार फोडले.त्यांना इडीची बेडी दाखवली.म्हणून ते रात्री बेरात्री गुवाहाटी पळाले.जर गुलाबराव किंवा चिमणराव यांना रात्री शेतात जाऊन मोटर चालू करून पाणी भरायला सांगितले तर तेथे जातील का?तेंव्हा साप,विंचू चावतो.आणि रात्री पायी पायी सुरत कडे निघाले,पावसात निघाले तेंव्हा साप , विंचू चावला नसेल का? कदाचित रस्त्यावर साप,विंचू भेटले असतील पण ते सुद्धा घाबरले असतील.बाप रे! मनुष्य इंगळी अति दारूण.जर मला चावा घेतला तिने? ही भीती असेल,साप,विंचूंना.यांना रस्त्यावर चोर दिसले नसतील का? हो.नक्कीच दिसले असतील किंवा यांना चोरांनी , लुटारूंनी पाहिलेच असेल.चोर तर रात्री सर्व्हिस देतात.पण त्यांनी डोके चालवले. अरे बापरे! हे तर महाभयंकर चोर आहेत.आपल्यापेक्षा उच्च श्रेणीचे आहेत.यांची ग्रेड जास्त आहे.आम्ही तर रात्री अंधारात लपतछपत चोरी करतो.हे तर दिवसाढवळ्या चोरी करतात.हे स्कील लय भारी!जर आपण यांना अडवले तर हे आपलाच खिसा खाली करतील.जर सरकारी तिजोरी रिकामी करू शकतात तर आपण किस गली में गलबला ?
  भाजपने अशा राजकीय चोरांना इडी ची बेडी दाखवून भांडी घासायला लावले तर ,बिघडले कुठे?उलट मी विनंती करतो कि,भाजपने या चोरांच्या खिशातून किती रूपये काढून घेतले,ते जाहीर करायला पाहिजे.यांचे नांव, फोटो, रक्कम सुद्धा पेपरला,टिव्हीला, वेबसाईट ला प्रसिद्ध केले पाहिजे.जसे पोलिस स्टेशनमध्ये चोरांचे फोटो,नाव प्रदर्शित केलेले असते.
    राजकीय पक्ष कोणताही असो पण राजकारण करतांना चोरी करणे हेच जास्त हानीकारक आहे.आपण सुद्धा आपल्या पक्षाच्या, आपल्या जातीच्या चोरांचा बचाव करीत असू तर आपण ही चोरच आहोत.ज्या लोकांनी,जैन,खडसे, भुजबळ, देशमुख,मलिक यांच्या साठी मोर्चा काढला ते ते चोर आहेत.कारण भ्रष्टाचार कारणे जर अटक झाली तर न्याय देण्यासाठी न्यायालयात जा.तेथे सिद्ध करा कि,आमच्या नेत्यांनी चोरी केली नाही.पण मोर्चा काढणे म्हणजे उघड उघड चोरीचे समर्थन करणे.उलट असे सांगायला पाहिजे कि,भाऊ दादा,काका,मामा तुम्ही चोरी करूच नका.जरी ते चोरी करीत असले तरी आपण त्यांना अडवले पाहिजे.तुम्ही चोरी करून आम्हाला देणार.आम्ही दारू मटण खाणार.आणि तुम्ही एकटे जेलमध्ये जाणार.तुमच्या चोरीत आम्ही वाटेकरी असलो तरी पण पापात वाटेकरी होणार नाहीत.असे रामायणात सांगितले आहे.
    मी मात्र, असा सल्ला जैन,खडसे , गुलाबराव यांना प्रत्यक्ष भेटून दिला होता.इतर लोकांशी भेट झाली नाही.भेटलो तर सांगणारच.नका करू चोरी.मोठेपण मिळाले, मंत्री पद मिळाले. तर त्याचा प्रामाणिकपणे वापर करा.लोक रस्त्यावर तुमचा पाया पडतील.पण येथे होते उलटेच.लोक तुमच्यावर शाही फेकतात, फोटोला चप्पल मारतात, प्रतिमा पायदळी तुडवतात.पुतळा जाळतात.
    नेत्यांनो, संध्याकाळी पिऊन विचार करा.किंवा सकाळी उतरल्यावर विचार करा.तरीही नाही कळले तर मला भेटा.मी तुम्हाला चोरी करण्यापासून प्रवृत्त करीन.

 मनुष्य इंगळी अति दारूण......चोरीची सवय जात नाही.
चावा घेतला मज तिने..........हात मारला रे याने.
या विंचवाला उतारा....आता लवकरच इडी लावा.
तमोगुण मागे सारा....‌...घाला याला मधे .
किंचीत राहिली फुणफुण.....तरीही सुधरत नसेल तर,
शांत केली जनार्दने. ...... मला येऊन भेटा.डोस देतो.

... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

Post a Comment

Previous Post Next Post