1बाप अन् मुले 60 तरी पत्नी म्हणते अजून हवीत मुले'


जानेवारी 4 -- पाकिस्तानमधील बलूचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटामध्ये सरदार हाजी जान मोहम्मद यांनी दावा केला आहे की, रविवार त्यांच्या घरात ६० व्या मुलाने जन्म घेतला.
त्यांनी माध्यमांना सांगितले की, त्यांची पाच मुले अल्लाहला प्यारी झाला तर ५५ मुले निरोगी व जिंवत आहेत.हाजी जान यांनी म्हटले की, इतकी मुले जन्माला घातल्यानंतरही ते थांबणार नाहीत.
जर अल्लाहची मर्जी असेल तर त्यांच्या घरी अजून मुले जन्माला येतील.
यासाठी ते चौथ्यांदा बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत.५० वर्षीय सरदार जान मोहम्मद ख़ान खिलजी क्वेटा शहरातील ईस्टर्न बायपासजवळ राहतात व पेशाने ते डॉक्टर आहेत.

घराजवळच त्यांचे छोटेसे क्लीनिक आहे.हाजी जान यांनी आपल्या मुलाचे म्हणजे ६० व्या संतानचे नाव खुशहाल खान ठेवले आहे.
त्यांनी सांगितले की, खुशहालचा जन्म होण्याआधी ते आपल्या पत्नीला उमरा येथे घेऊन गेले होते.
त्यामुळे त्यांनी मुलाचे नाव हाजी खुशहाल खान ठेवले आहेत.

हाजी जान यांना आपल्या सर्व मुलांची नावे पाठ आहेत.
हाजी यांनी म्हटले की, त्यांना अजून मुले जन्माला घालायची आहेत.
त्यांच्या तीन पत्नींची इच्छाही अशीच आहे.जान मोहम्मद यांच्या काही मुला-मुलीचे वय २० वर्षाहून अधिक असून ते सर्व शिक्षण घेत आहेत.जगातील अनेक देश लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी अनेक उपाय योजत असताना पाकिस्तानमध्ये याचे नामोनिशान दिसत नाही.

पाकिस्तान जगातील आठ अशा देशांमध्ये सामील आहे जो २०५० पर्यंत जगातील एकूण लोकसंख्येच्या वृद्धीमध्ये ५० टक्के योगदान देईल.संयुक्त राष्ट्र संघ द्वारे जारी आकड्यानुसार १९६० च्या दशकापासून जगातील लोकसंख्या वृद्धी दर कमी होत आहे.
२०२० मध्ये हा दर १ टक्क्याहूनही कमी होता मात्र पाकिस्तानमध्ये हा दर १.९ टक्के असा होता.



Post a Comment

Previous Post Next Post