आमदार दाखवा, हजार रुपये मिळवा



पालघरचे आमदार श्रीनिवास तिकिटावर निवडून आलेले आहेत, मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले. वास्तविक वनगा तलासरी तालुक्याचे, मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना पालघरमधून आणले पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने वनगा निवडून आले. परंतु सध्या वनगा पालघर मतदारसंघात फारसे फिरकत नाहीत, त्यामुळे विकासकामे खोळंबल्याची तक्रार केली जाते. शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात बसून वनगा दिवस ढकलत असल्याची चर्चा असून आमदार दाखवा आणि हजार रुपये मिळवा, असे मेसेज व्हायरल होऊ लागले आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post