श्री दिंगाबर साई देवस्थान सेवा समिती आरमोरी बर्डीच्या वतीने संत लहरीदास महाराज यांचा पुण्यतीथी सोहळ्याचे आयोजन

दिनेश बनकर कार्यकारी संपादक
सुपर फास्ट बातमी7822082216
गडचिरोली - दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री दिंगबर साई देवस्थान सेवा समिती आरमोरी बर्डीच्या वतीने वंदनिय संत लहरीदास महाराज यांचा पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन दिनांक 16/01/2023 ते दिनांक 17/01/2023 पर्यंत भजन, कीर्तन, पालखी सोहळा व निरनिराळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक 16/01/2023 रोज सोमवाला सकाळी 10 वाजता घटस्थापना ह.भ.प.श्री. क्षिरसागर महाराज उराडी यांचे हस्ते पार पडेल.सायंकाळी 6.30 वाजता हरिपाठ कार्यक्रम होईल. तसेच रात्री 8 वाजता कीर्तनाचा कार्यक्रम होईल. दिनांक 17/01/2023 रोज मंगळवारी सकाळी 8 वाजता वंदनीय संत लहरीदास महाराज यांची पालखी सोहळा काढण्यात येईल. दुपारी 1वाजता भजन, कीर्तन ,व गोपाळकाला कार्यक्रम होईल.व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.तरी कार्यक्रमास भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व संताचे उपदेशाचे लाभ घ्यावा. असे आव्हान संचालक मंडळाच्या तथा सर्व गुरू बांधव श्री दिंगबर साई देवस्थानच्या सेवा समितीने केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post