वाघाच्या हल्ल्यात एक इसम जखमी



सावली वनपरीक्ष्रेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहड खुर्द उप वन क्षेत्रातील केरोडा परिसरात आपल्या शेतात कापूस काढत असताना दडी मारून बसलेल्या पट्टेदार वाघांनी केरोडा येथील मनोज कुंभारे हया शेतकऱ्यावर हमला करून जखमी केले. सदर माहिती गावकऱ्यांनी माजी बांध. सभापती दिनेश पा चिटनूरवार कळवण्यात आली. त्यांनी क्षणाचा ही विलंब न लावता सावली वन क्षेत्रातील वन अधिकारी फोन करून माहिती देऊन जखमी शेतकऱ्यास सामान्य रुग्णालयात गडचिरोली येते भरती करण्यात आली.


स्वतः रुग्णालयात जाऊन जखमी मनोज शालीकराम कुंभारे यांना भेट दिली. त्या नंतर वन विभागाचे कर्मचारी R.F.O साहेब, वनपाल सुरवंशी साहेब व त्यांचे सहकारी यांना घेऊन वाघाचा हमला झाला त्या ठिकाणावर जाऊन पाहणी करण्यात आली . त्यावेळी माजी बांधकाम सभापती मा. दिनेश पा चिटनूरवार, केरोडा येथील ग्रा प उपसरपंच ओमप्रकाश सा ढोलने, त.मु. अध्यक्ष मनोहर चलाख, ग्रा प सदस्य नितेश कावटवार, सचिव पा वा समिती मंगेश जाजमवार त्यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post