डी. एन. नगर एम. पी. शाळेचा रग्बीचा मूलींचा संघ राज्यस्तर स्पर्धेसाठी पात्र



प्रतिनिधी : दिलीप अहिनवे, मुंबई 
अंधेरी, दि. १६ : मुंबई उपनगर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय अंतर्गत रग्बी खेळाच्या विभागीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बॉम्बे जिमखाना येथे पार पडलेल्या स्पर्धात १३ संघांनी अत्यंत चूरशीचा खेळ केला. अंधेरी के/पश्चिम विभागातील डी. एन. नगर एम. पी. एस. या मुंबई महापालिकेच्या शाळेतील १४ वर्षा आतील मूलींच्या संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले. पूर्वा बोवणे, सबा हाश्मी, रिया बोवणे व शौर्या जैस्वाल यांनी सुंदर खेळी करुन विजयश्री खेचून आणली. रायगड येथे होणाऱ्या राज्यस्तर स्पर्धेसाठी हा संघ पात्र झाल्यामुळे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुलींच्या संघाला महापालिकेचे मेहनती शारीरिक शिक्षण शिक्षक ओमकार तळेकर यांनी प्रशिक्षित केले आहे. 

मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी, वरिष्ठ पर्यवेक्षक राजेश गाडगे, प्राचार्य रवींद्र परदेशी, पर्यवेक्षक दत्तु लवटे, प्रशासकीय अधिकारी (शाळा) अस्मिता कासले, कनिष्ठ पर्यवेक्षक विश्वनाथ गढरी व मुख्याध्यापक रक्षा पटेल यांनी यशस्वी संघातील विद्यार्थिनी व मार्गदर्शक शारीरिक शिक्षण शिक्षक ओमकार तळेकर यांचे अभिनंदन केले तसेच राज्यस्तर स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post