दुचाकीने दारू वाहतूक करणाऱ्याला पकडता अन् गावात खुलेआम दारू विकणारे यांना कधी पकडता साहेब


कुरखेडा, १६ जानेवारी : शहरात दुचाकीच्या डिक्की दारू आणून विक्री करत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच फव्वारा चौकात तपासणी दरम्यान दुचाकीत अवैध देशी दारूच्या २४ बॉटल आढळून आल्याने आरोपी आरिफ इकराम अली शेख (३६) याच्या विरोधात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे साहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे, पोलीस उपनिरीक्षक शितल माने, पोलीस शिपाई अश्विनी रामटेके यांनी रविवार १५ जानेवारी शहरातील फव्वारा चौकात संशयावरून एम एच ३३ए ई ६३३१ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाच्या डिक्कीची तपासणी केली असता अवैध देशी दारूच्या २४ बॉटला आढळून आल्या. यावरून आरोपी आरिफ शेख याच्या विरोधात मुंबई दारू बंदी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला तसेच दूचाकी व दारू जप्त करण्यात आली. पूढील तपास पोलिस उपनिरीक्षक शितल माने करीत आहेत. अशीच धडक मोहीम पोलीस विभागाने कुरखेडा गल्लोगल्ली मध्ये राबवावी असे नागरिकांनी पोलीस प्रशासनाला मागणी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post