गडचिरोली जिल्हा रहिवासी वगळता उर्वरित महाराष्ट्रातील उमेदवार पोलीस शिपाई / चालक पोलीस शिपाई भरतीकरीता पात्र नाहीत.

दिनांक- ०२/०१/२०२३


गडचिरोली :- 
महाराष्ट्र शासनाने राज्यातील संपूर्ण जिल्ह्यासाठी जाहीर केलेल्या १४ पदांच्या पोलीस भरती प्रक्रिया ही महाराष्ट्रातील विविध ठिकाणी चालू झालेली असून, गर्दाघरात पोलीस दलातर्फे राबविण्यात येणाऱ्या ३४८ पोलीस शिपाई व १६० चालक पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया ही दिनांक ०१ जानेवारी २०२३ रोजी पासून गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर चालू झालेली आहे.

गडचिरोली जिल्यात राबविण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई या पदाकरीता शासन निर्णय क्र. आरसीटी- १५१७/सी.आर.२४१/पोल- अ. तसेच चालक पोलीस शिपाई या पदाकरीता शासन निर्णय क्र. एमटीएम- ०३१५/प्र.क्र.२४५ (भाग-२)/ पोल - ४ या संदर्भीय अधिसूचनेनुसार महचिरोली जिल्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांना चिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल, सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधीत तहसिलदार यांनी दिलेला वास्तव्याचा दाखला (Residential certificate) जोडणे आवश्यक राहील, असे नमूद केलेले आहे. तसेच गडचिरोली पोलीस दलाने दि. ०५/११/२००२ रोजी दिलेल्या जाहीरातीमध्ये स्पष्टपणे नमूद केले होते की, महाराष्ट्र शासन, गृह विभाग, अधिसूचना दिनांक २३ सप्टेंबर २०२२ अन्वये गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिला पोलीस भरती मध्ये भाग घेता येईल. सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधीत तहसिलदार यांनी दिलेला वास्तव्याचा दाखला (Residential certificate) जोडणे आवश्यक आहे. या आधारावरच फक्त गढ़चिरोली जिल्यातील रहीवासी उमेदवारच सदर भरतीकरिता पात्र आहेत. त्यामुळे रित जिल्ह्यातील उमेदवारांना कळविण्यात येते की, आपण गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई या पदाकरीता पात्र नाहीत. तरी आपण भरतीकरीता येऊ नये असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल सा. यांनी फेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post