हरांबा येथे ११ कुंडीय गायत्री महायज्ञ संगित प्रवचन व दिप महायज्ञ उत्सव.*


      *दिनांक ७ ते ९ जाने २०२३ पर्यंत आयोजन.*        
                            अंधाराला चिरून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतिक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा हा उद्देश साधत ११ कुंडीय गायत्री महायज्ञ दर तीन वर्षानी होऊ घालण्यात येत आहे, याप्रमाणेच यावर्षीही रोज शनिवार, दिनांक ७ जानेवारी ते ९ जानेवारी २०२३ रोजी तिन दिवसीय महायज्ञ अखिल विश्व गायत्री परिवार हरांबा तथा समस्त गावकरी मंडळी हरांबा /उमरी यांनी जीवन विकास विद्यालय हरांबा शाळेच्या प्रांगणात आयोजन केलेले आहेत. ११ कुंडीय गायत्री महायज्ञ निमित्य हरिव्दार येथील शातिकुंज येथुन प्रग्यापुत्र मुख्य प्रवचनकार विनायकजी धोटे महाराज व सहकारी यांच्या हस्ते दिप महायज्ञ उत्सव व संगीत प्रवचन पार पडणार आहे.दिनांक ०७ जानेवारी २०२३ रोज शनिवारला सकाळी पहाटे ५ वाजता ग्रामसफाई,दुपारी २ वाजता भव्य मंगल कलश यात्रा (लेझिम सोबत) तिलमलनाथ मंदिर मधुन प्रांरभ,सांयकाळी ५ वाजता संगित प्रवचन. दिनांक ०८ जाने २०२३ रोज रविवारला स‍काळी ११ वाजता भव्य रक्तदान शिबिर सौजन्य वैनगंगाकाठ ग्रामिण विकास बहुउददेशीय संस्था हरांबा,सायकांळी ५ वाजता संगित प्रवचन व १००८ दिप महायज्ञ.दिनांक ०९ जानेवारी २०२३ ला सकाळी ११ कुंडीय गायत्री महायज्ञ,संस्कार यामध्ये गर्भसंस्कार,नामकरण,अन्नप्राशन,मुंडन,शिखा स्थापन,विद्यारंभ व गायत्रीमंत्र दिक्षा जन्मदिवस व विवाह दिवस संस्कार वरील संस्‍कार होणार आहेत.पुर्णाहुती,निरोप समारंभ.सायंकाळी ३ वाजता महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत. सर्व धार्मिक भाविकांना ११ कुंडीय गायत्री महायज्ञ व संगीत प्रवचनाचा लाभ घेण्याचे अखिल विश्व गायत्री परिवार हरांबा कडून करण्यात आलेले आहे,



Post a Comment

Previous Post Next Post