वनविभागाची धडक कार्यवाही मेंढा येथील अतिक्रमण हटविले




गडचिरोली:- दिनांक २२/०१/२०२३ रोजी गडचिरोली परिक्षेत्रातील मौजा मेंढा येथे कक्ष क्र. १७७P मधील ०.२० हे. आर जागेवर गावातील काही लोकांनी कच्या झोपडया बांधून केलेले अतिक्रमण वनविभागाच्या सतर्कतेमुळे अतिक्रमणीत लोकांचे मनसुभे वन विभागाने हानुन पाडले व वनअधिकारी आणि कर्मचारी यांनी मिळून गावातील सरपंच व पोलीस पाटील यांचे सहकार्याने दहा (१०) झोपडया नष्ट करुन त्याला लावलेले शिवार फाटे जप्त केले व वनपरिक्षेत्र कार्यालय गडचिरोली येथे जमा करण्यात आले.





सदर कार्यवाही मा. वनसंरक्षक (प्रादे) गडचिरोली, मा. उपवनसंरक्षक (प्रादे) गडचिरोली, मा. सहाय्यक वनसंरक्षक, गडचिरोली, यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, गडचिरोली, क्षेत्र सहाय्यक, गडचिरोली, वनरक्षक बोदली व इतर वनकर्मचारी यांच्या अथक परिश्रमाने व सहकार्याने पार पडली.

यापुढे जिथे अतिक्रमण आहेत तेथील निर्मूलन करुन अतिक्रमण हटविण्याची योजना डॉ किशोर मानकर, वनसंरक्षक (प्रादे) गडचिरोली व श्री मिलीश दत्त शर्मा, उपवनसंरक्षक (प्रादे गडचिरोली तसेच सध्या उपवनसंरक्षक (प्रादे) गडचिरोली चे अतिरीक्त कार्यभारात असलेले श्री जमीर शेख, विभागीय वन अधिकारी दक्षता यांचे मार्गदर्शनात आखण्यात आलेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post