खोटया व बदनामीकारण बातम्या पोर्टलवर प्रसारीत न करण्याकरीता १० लाख रूपयेची खंडणी


तक्रारदार श्री. सचिन शंकरप्रसाद अग्नीहोत्री, रा. अग्नीहोत्री कॉलेज कॅम्पस, वर्धा यांनी आज दि. ०२/०१/२०२३ रोजी पोलीस स्टेशन, वर्धा शहर येथे लेखी तक्रार सादर केली की, त्यांचे मालकीचा मेन मार्केटमधील एका गाळा धामेचा नावाचे व्यक्तीस काही दिवसापुर्वीच किरायाने दिला होता. त्याच्या शेजारी सुभाष जैन यांचे ड्रायफ्रुट चे दुकाण होते. धामेचा व जैन यांच्यात काही कारणावरून शाब्दीक वादावाद झाला. त्यामुळे धामेचा यांनी फोन केलेवरून तक्रारदार त्या ठिकाणी गेले असता धामेचा व जैन यांचेमधील वाद संपलेला होता. सुभाष जैन हे वयस्कर व्यक्ती होते व त्यांना शारिरीक आजार होते. जैन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दवाखाण्यात नेले असता तिथे ते मरण पावले.

यावरून आरोपी मंगेश चोरे, रा. नेरी पुनर्वसन याने ऑक्टोबर २०२१ मध्ये त्याच्या महाराष्ट्र न्युज ७ पोर्टलवर “वर्धा येथील नामवंत सचिन अग्नीहोत्री व्दारा सुभाष जैन यांची हत्या’ अशा आशयाचा खोटया व बदनामी कारक बातम्या व्हायरल केल्या होत्या.


आरोपी मंगेश चोरे याने तक्रारदार श्री. अग्नीहोत्री यांचेवर हत्येसारख्या गंभिर गुन्हयाच्या आरोपाच्या खोटया व बदनामीकारक बातम्या न छापण्याकरीता तक्रारदार यांचे त्याचे परीचीत व्यक्तीशी संपर्क करून खोटया व बदनामीकारण बातम्या पोर्टलवर प्रसारीत न करण्याकरीता १० लाख रूपये खंडणीची मागणी केली.


अशा आशयाचे तक्रारदार श्री. सचिन शंकरप्रसाद अग्नीहोत्री, रा. अग्नीहोत्री कॉलेज कॅम्पस, वर्धा यांचे लेखी तक्रारीवरून पो.स्टे. वर्धा शहर येथे दि. २०/०१/२०२३ रोजी अप क ००७६ / २३ कलम ३८९, ५०६ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.


यापुर्वी फिर्यादी पंकज तडस, रा. वर्धा यांचेकडुन खंडणीची मागणी करून १ लाख रू खंडणी घेतली. अशा तक्रारीवरून आरोपी मंगेश चोरे, रा. नेरी पुनर्वसन, सालोड, याचे विरूध्द दि. ०७/०१/२०२३ रोजी पो. स्टे. वर्धा शहर येथे अप क २६/ २३ कलम ३८४, ३८५, १२०(ब), १०९ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

तरी नागरीकांना आवाहन करण्यात येते की, आरोपी मंगेश चोरे यांने कोणत्याही कारणावरून खंडणीची मागणी केली असल्यास कोणत्याही संकोच न बाळगता संबंधीत पोलीस स्टेशन संपर्क करावा.


Post a Comment

Previous Post Next Post