कोरोना काळात देव काही कामात आला नाही... तर डॉक्टरच ठरले देव


निसर्गाची आघाद लिला,त्याला आपण देवांचे परमेश्वरांचे नांव देतो.
कोरोना काळात अनेक संकटांना सामना केल्यामुळे माणसाच्या मेंदूवरील भटा ब्राम्हणांनी नियंत्रण ठेऊन देव किंवा परमेश्वर बसून ठेवला होता.तो कुलूप बंद झाला होता.त्यामुळे माणसांच्या संकटात डॉक्टर नर्स,मेडिकल दुकान,स्वच्छता ठेवणारे महानगरपालिका कर्मचारी आणि पोलीस हे परमेश्वरा सारखे वाटत होते.त्यात ओरीजनल कोणत्याही देवाची त्यांना मंत्राने नियंत्रणात ठेवणारा भट ब्राम्हण पुजारीची मदत होत नव्हती.कोरोना काळापूर्वी ही तो कोणतीच मदत करीत नव्हता.आता ही नाही.पण माणसांचा विश्वास काही केला कमी झालेला दिसत नाही.
निसर्गाची आघाद लिला,त्याला आपण देवांचे परमेश्वरांचे नांव देतो.कोणताही अर्ज केला नव्हता की,कुणाचीही शिफारस नव्हती,असे कोणतेही असामान्य कर्तुत्वही नाही,तरीही डोक्याच्या केसांपासून पायाच्या अंगठ्यापर्यंत 24 तास निसर्ग माणसांच्या शरीरात रक्त फिरवत असतो.पण आपण त्याचे सर्व श्रेय देवाला देतो.देवच रक्त फिरवतो.जिभेवर नियमित अभिषेक करत असतो.अखंडपणे माणसांचे हे हृदय चालवतो.चालणारे कोणते यंत्र निसर्गाने फिट करुन दिले आहे.आपण ते सर्वच देवाने दिले म्हणतो.
पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत विना अडथळा संदेशवहन करणारी प्रणाली.कोणत्या अदृष्य शक्तीने चालते आहे.याचा शोध विज्ञानाने घेतला.माणसातून डॉक्टरांचे शिक्षण घेतलेला माणूस म्हणजेच डॉक्टर देवदूत बनतो.निसर्गाचा नियम न पाळणाऱ्यामुळे शरीरातील ही यंत्रणा कधी कधी बंद पडते.माणसाला त्यातले काही कळत,काही समजत नाही.तरी तो सर्वच देवामुळे,परमेश्वरामुळे हे होते असे मानतो.म्हणूनच तो शाळा,कॉलेज दवाखान्या पेक्षा मंदिराला जास्त महत्व देऊन सढळ हस्ते आर्थिकदृष्ट्या मदत करतो.माणसांच्या शरीरातील कोणत्याही भागाने अचानक काम करणे बंद केले तर त्याला मंदिरात नेल्या जात नाही.तर दवाखान्यात नेल्या जाते,तेव्हा डॉक्टर आपली कलाकौशल गुणवंता दाखवून औषधाचा वापर करून इलाज करतो.तेच औषध शरीरात गेल्यावर काम करते.आणि शरीरातील बंद पडलेली यंत्रणा सुरु होते.वेदना कमी होऊन शरीरातील चेतना वेगाने काम करते.
निसर्गाने हाडांमासामध्ये तयार होणारे रक्त कोणते जगावेगळे आर्किटेक्चर आहे.याचा माणसाला मागमूसही नसतो.हजार हजार मेगापिक्सलवाले दोन दोन डोळे कॅमेरे अहोरात्र सगळी दृश्ये टिपत असतात.दहा दहा हजार टेस्ट करणारा जीभ नावाचा टेस्टर,अगणित संवेदनांची जाणीव करुन देणारी त्वचा नावाची सेन्सर प्रणाली.आणि वेगवेगळया फ्रिक्वेंसीची आवाजनिर्मिती करणारी स्वरप्रणाली आणि त्या फ्रिक्वेंसीचे कोडींग डीकोडींग करणारे कान नावाचे यंत्र.त्याच बरोबर पंचाहत्तर टक्के पाण्याने भरलेला शरीररुपी टँकर हजारो छिद्रे असतानाही कुठेही लिक होत नाही.निसर्गाने दिलेले दोन पाय स्टॅण्डशिवाय मी उभा राहू शकतात.गाडीचे टायर झिजतात, पण माणसांच्या पायांचे तळवे कधीही झिजत नाही.अद्भुत अशी रचना निसर्गाने केली असतांना ही त्याचे सर्व श्रेय आपण देवांचे परमेश्वरांचे नांव देत असतो.
माणसांच्या शरीरातील सर्व यंत्रणा संभाळणे,स्मृती,शक्ती,शांती हे सर्व निसर्ग नियमाने पाळले तर योग्य असते.पण आपण नेहमीच देवाने दिले म्हणतो.खरच देवातुच आत बसुन शरीर चालवत आहेस.अद्भूत आहे हे सर्व,अविश्वसनीय,अनाकलनीय.अशा शरीररुपी मशीनमध्ये कायम तुच आहेस,याची जाणीव करुन देणारा आत्मा देवा तू असा काही फिट बसविला आहे की आणखी काय तुझाकडे मागावे असे कोणत्या ही माणसाला वाटत नाही.तो सतत काही ना काही मागत असतोच.त्यासाठी नवस करतो.पायी पदयात्रा काढण्याचे वाचन देतो.पण निसर्गाच्या नियमांचे पालन करून वागेन असे कधीच म्हणत नाही.शरीरातील खेळाचा निखळ,निस्वार्थी आनंदाचा वाटेकरी राहावा.अशी सद्बुद्धी प्रत्येक माणसाला दिली पाहिजे.निसर्ग आणि देव,परमेश्वर हे सर्व सांभाळतो आहेस याची जाणीव माणसांनी सदैव ठेवली पाहिजे.रोज क्षणोक्षणी कृतज्ञतेने निसर्गाचे ऋणी असल्याचे स्मरण,चिंतन झाले पाहिजे.निसर्गाची आघाद लिला,त्याला आपण देवांचे परमेश्वरांचे नांव देतो.हरकत नाही पण निसर्गाच्या नियमांचे पालन करावे.माणसाच्या मनाचे शरीराचा समतोल राखावा.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

Post a Comment

Previous Post Next Post