दुचाकीसह ट्रॅक्टर पुलावरून खाली कोसळून एक ठार


मुल : चामोर्शी मार्गावरील उमा नदीच्या पुलावरील घटना

घरातील पूजेचे निर्माल्य नदीपात्रात विसर्जन करीत असताना मुल वरून चामोर्शीच्या दिशेने जात असलेल्या ट्रॅक्टर ने धडक दिल्याने पती पत्नी सह ट्रॅक्टर चालक ही पुलावरून खाली कोसळल्याने पती जागीच ठार झाला तर पत्नी आणी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

नववर्ष्याच्या पहिल्या दिवशी फिस्कुटी येथे देवीच्या दर्शनाला दुचाकी क्रमांक एम. एच. 34 ए. एफ. 6922 ने जात असताना घरातील पूजेचे निर्माल्य वाटेत पडणाऱ्या उमा नदीच्या पात्रात टाकत असतांना मुल वरून चामोर्शीच्या दिशेने जाणारा ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. 33- 4034 ने त्यांना धडक दिल्यानंतर दुचाकीसह ट्रॅक्टर ही पुलावरून खाली कोसळली. या अपघातात मुल येथील 54 वर्षीय गणपत आगडे हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी सुरेखा आगडे आणी ट्रॅक्टर चालक किशोर पोरटे हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचाराकरिता उप जिल्हा रुग्णालय मुल येथे हलविण्यात आले. पोलिसांनी चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गणपत हा कल्याणी ज्वेलर्स मुल येथे कामावर होता. नववर्ष्याच्या पहिल्याच दिवशी गणपत च्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करित आहे.

Post a Comment

Previous Post Next Post