कढोली कार्यक्रम: राष्ट्रीय युवा दिनी विद्यार्थी धावले



वैरागड (वार्ता) राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा तीन म्हणून श्री तुकाराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कढोली येथे उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्ताने कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या कबड्डी , गोडाफेक, दौड या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या मुली साठी 400 मीटर व मुलांसाठी 800 मीटर दोन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तसेच आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा च्या वतीने मी सती नदी बोलतोय या विषयावर आधारित निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आली यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव डॉ. मोहन आकरे होते प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य जी. ई. पडोळे, डी. सी. मानकर, प्रा. एस.एम.जूवारे, अपंग परिसर संघाच्या संचालिका संगीता तुमडे, गीता मेहेर , ई.के. बंडे, केशव बनसोड, प्रल्हाद चांदेवार, एम. एस. कापगते, प्रा. एम. व्हीं. बावनकर, सुरेश निपाने, कैलास भानारकर, सिताराम कुमरे, महेश आकरे, प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालक प्रा. प्रदीप बोडने यांनी केले आभार प्रदर्शन जे. एम. भसारकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लालाजी सहारे, अनिल लाउत्रे, वामन लांजेवार ,संजय निंबेकर व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. फोटो: दौड स्पर्धेत सहभागी विद्यार्थी

Post a Comment

Previous Post Next Post