विसापूर येथे झालेल्या सबज्युनिअर अँथलेटिक्स स्पर्धेत पी.आर.डी.स्पोर्ट्स, ब्रम्हपुरी च्या विद्यार्थ्यांचा दरारा.*



विसापूर :- महाराष्ट्रात अम्यचुर अँथलेटिक्स
असोसिएशन द्वारा संचालित चंद्रपूर जिल्हा अम्यचुर अँथलेटिक्स असोसिएशन तर्फे
आज दिनांक १५ जानेवारी २०२३ ला विसापूर येथे सबज्युनिअर अथलेटिक्स स्पर्धेत पी.आर.डी. स्पोर्ट्स ब्रह्मपुरी च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत ८ गोल्ड ,११ सिल्वर व ६ ब्रांज मेडल मिळविले ज्यामध्ये ८ वर्षाआतील मुलींच्या गटात कुमारी शरण्या वानखेडे हिने ५० मीटर रनिंग  ८० मीटर रनिंग प्रकारात दुतीय  व लांबउडी प्रकारात दुतीय क्रमांक तर ८ वर्षाआतील मुलींच्या गटात ५० मीटर रनिंग च्या प्रकारात कुमारी.अधीरा गावतुरे हिने तृतीय क्रमांक पटकावला तर ८ वर्षाआतील मुलांच्या  गटात ८० मीटर रनिंग च्या गटात कुमार. स्पर्श डोंगरवार याने प्रथम क्रमांक तर ५० मीटर च्या रनिंग प्रकारात दुतीय क्रमांक मिळविला तर १० वर्षाआतील मुलींच्या गटात कुमारी. श्वेता पिलारे हिने १०० मीटर रनिंग स्पर्धेत  प्रथम क्रमांक तर ५० मीटर रनिंग स्पर्धेत दुतीय पटकाविला तर  १० वर्षाआतील मुलींच्या गटात कुमारी. आरुषी फटींग हिने १०० मीटर रनिंग स्पर्धेत तृतीय  क्रमांक पटकाविला १० वर्षाआतील मुलांच्या  गटात कुमार. अनुराग  वानखेडे याने लांबउडी स्पर्धेत  प्रथम क्रमांक तर १०० मीटर रनिंग  स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला तर १० वर्षाआतील मुलांच्या गटात  गोळाफेक स्पर्धेत कुमार. मनन सोनूले याने प्रथम क्रमांक पटकाविला  तर १० वर्षाआतील मुलांच्या  गटात ५० मीटर रनिंग स्पर्धेत कुमार. हार्दिक गुरनुले याने दुतीय क्रमांक पटकाविला तर १० वर्षाआतील मुलांच्या  गटात लांब उडी प्रकारात कुमार.हर्ष शेडमाके याने दुतीय क्रमांक 
पटकाविला १२ वर्षाआतील मुलांच्या गटात गोळा फेक स्पर्धेत आलाप शिवूरकर याने प्रथम क्रमांक पटकावला तर दुतीय क्रमांक राजवीर भेदे याने पटकाविला तर तृतीय क्रमांक किंशुक धकाते याने पटकाविला १२ वर्षाआतील मुलांच्या गटात लांब उडी स्पर्धेत कुमार. अथर्व सोनूले याने  प्रथम क्रमांक पटकाविला १२ वर्षाआतील मुलींच्या गटात २०० मीटर रनिंग स्पर्धेत कुमारी. माही अवसरे हिने दुतीय तर ४*१०० रिले स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तर
१२ वर्षाआतील मुलांच्या गटात कुमार.क्रीष्णा डोंगरवार याने तृतीय क्रमांक पटकावला तर सांघिक क्रीडा प्रकारात  ४*१०० च्या रिले रनिंग स्पर्धेत प्रकारात १० वर्षाआतील मुलांच्या व मुलींच्या गटात प्रथम तर १२ वर्षाआतील  ४*१०० रिले रनिंग स्पर्धेत मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला सर्व विजेत्यांना चंद्रपूर जिल्हा अम्यचुर अँथलेटिक्स असोसिएशन च्या पदाधिकाऱ्या हस्ते मेडल ,ट्रॅफि व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या विजयाचे श्रेय पी.आर. डी. स्पोर्ट्स, ब्रम्हपुरी चे संचालक व क्रीडा प्रशिक्षक राहुल जूआरे सर व पालकांना दिले .

Post a Comment

Previous Post Next Post