दुसऱ्या जातीतील मुलीशी विवाह करा आणि मिळवा 2 लाख 50 हजार रुपये..


मुंबई : सरकारकडून अशा काही योजना चालवल्या जातात, ज्याबाबत अनेकांना माहिती नसते. सरकार देशात अशीच एक योजना चालवत आहे, ज्याद्वारे लोकांना सामजिक सुरक्षा देण्यासह आर्थिक मदतही देते. ही आंतरजातीय विवाह योजना आहे. देशात समानतेचा अधिकार देणं आणि भेदभाव संपवण्याच्या दृष्टीने सरकारकडून ही योजना चालवली जाते.


आंतरजातीय विवाह योजना लग्न झालेल्या लोकांना २.५० लाख रुपयांपर्यंत पैसे देते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लग्न झालेल्या लोकांकडे त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेत मिळणारे पैसे केवळ अशा जोडप्याला दिले जातील, ज्यांनी एका जातीतून दुसऱ्या जातीमध्ये लग्न केलं आहे. जर एखादी व्यक्ती जनरल कॅटेगरीतील असेल आणि या त्याने इतर समुदायात लग्न केलं तर त्याला या योजनेचा लाभ घेता येईल.

आंतरजातीय विवाह प्रमोशन योजनेत सरकारकडून पैसे मिळण्यासाठी एक समृद्ध हिंदू आणि एक अनुसूचित जाती या दोघांमध्ये लग्न होणं गरजेचं आहे. तसंच हिंदू मॅरेज अॅक्ट १९९५ अंतर्गत लग्न झाल्याच्या एक वर्षाच्या आत यासाठी रजिस्ट्रेशन करणं महत्त्वाचं आहे. दुसरं लग्न करणाऱ्यांसाठी ही योजना लागू होत नाही.

त्याशिवाय या योजनेचा फायदा घेण्यासाठी चुकीची माहिती दिल्यास नियमांनुसार दंड भरावा लागेल. त्याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेतला असल्यास दुसऱ्या योजनेतील रक्कम या योजनेतून वजा करुन दिली जाईल.

कसा कराल अर्ज?

तुम्ही राहत असलेल्या भागातील आमदार किंव खासदाराकडे या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल. त्यानंतर हा अर्ज डॉ. आंबेडकर फाउंडेशनकडे पाठवला जाईल. त्याशिवाय या योजनेअंतर्गत फॉर्म भरुन तो राज्य सरकार आणि जिल्हा कार्यालयातही पाठवता येईल.




कागदपत्रं

अर्जासह जात प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्याशिवाय मॅरेज सर्टिफिकेटही गरजेचं आहे. तसंच हे पहिलंच लग्न आहे हे दाखवणारे इतर कागदपत्र देणंही आवश्यक आहे. पती-पतीच्या उत्पन्नाचं प्रमाणपत्रही अनिवार्य आहे. तसंच दोघांचं जॉइंट बँक अकाउंट देणं गरजेचं आहे. अर्ज मंजूर झाल्यानंतर पती-पत्नीच्या जॉइंट खात्यात १.५ लाख रुपयांची रक्कम दिली जाईल आणि १ लाख रुपयांची एफडी करुन दिली जाईल.

सौजन्य: महाराष्ट्र टाइम्स 

Post a Comment

Previous Post Next Post