मुख्याध्यापकाने शेतात एकटी असल्याची संधी साधून 29 वर्षीय विवाहित महिलेवर केला बलात्कार


नांदेड:- जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका मुख्याध्यापकाने शेतात एकटी असल्याची संधी साधून 29 वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार केला आहे. या घटनेने संपुर्ण जिल्हात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना समोर येताच सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मरखेल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाधर पांढरे असे या आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, एका विवाहित महिलेवर मुख्याध्यापक असलेल्या व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात समोर आली आहे. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास शिळवणी शिवारात घडली आहे. शिळवणी येथील 29 वर्षीय विवाहित महिला ही गावातील नागेंद्र हडोळे यांच्या शेतात रविवारी तुरीचा सरवा वेचण्यासाठी सकाळी दहाच्या सुमारास गेली होती. दरम्यान, दुपारी एकच्या सुमारास व्यंकटराव देशमुख विद्यालयात मुख्याध्यापक असलेला गंगाधर पांढरे याने शेतात येऊन महिलेशी अश्लील चाळे करत झटापट केली.

बळजबरीने केला बलात्कार…

शाळेत मुख्याध्यापक असलेला गंगाधर पांढरे या नराधम शिक्षकाने महिलेला जबरदस्तीने ओढत धुऱ्यावरील लिंबाच्या झाडाच्या आडोशाला नेऊन बलात्कार केला. या मुख्याध्यापकाने स्वतःसोबत या महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, महिलेवर झालेल्या अत्याचारानंतर परिसरासह देगलूर तालुक्यात खळबळ उडाली असून, याप्रकरणी मरखेल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बलात्काराच्या घटनेमुळे पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे तपास करीत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post