भाऊ... दर रविवार आणि बुधवारला नियमीत भरणारा कोंबड बाजार उद्या (रविवारी) भरणार काय?


मूल :- तालुक्यातील दहेगांव मानकापूर परिसरात दर रविवार आणि बुधवारला नियमीत भरणारा कोंबड बाजार उद्या (रविवारी) भरणार काय? याबद्दल निश्चित माहिती होत नसल्यांचे कोंबड बाजार शौकीनात शंका—कुशंका व्यक्त केली जात आहे.
सावली येथील आणि सध्या केवळ कोंबड बाजाराचा 'धंदा' करण्यासाठी मूल शहरात कुणी 'सचिन'नामक व्यक्ती वास्तवास आहे. हा व्यक्ती कोंबड बाजार भरवित असल्यांची खात्रीलायक माहिती आहे. सचिनच्या पुढाकारातून, मूल तालुक्यातील दहेगांव—मानकापूरच्या जंगलात दर बुधवारी आणि रविवारी कोंबड बाजार भरविल्या जाते. नेमके ठिकाण आणि वेळ मोबाईलच्या माध्यमातून संबधितांकडे निरोप दिला जातो. या कोंबड बाजारात लाखोचा जुगारही खेळला जात असल्यांची माहिती आहे.

चितेगांव येथील नकली दारूच्या कारखाण्यावर धाड टाकल्यानंतर, मूल तालुक्यावर पोलिस यंत्रणेची बारीक नजर आहे. पोलिसांची नजर असल्यांने, उद्याचा कोंबड बाजार भरविण्यांची रिस्क घ्यायची काय? याबद्दल सचिन व त्याचे पाठीराखे साशंक असून, एकदा लिंक तुटली तर पुन्हा कोंबड बाजार भरविण्यास अडचण होईल अशी भिती एकीकडे आहे तर, कोंबड बाजार भ​रविला आणि मंदा तुकूम सारखी धाड पडली तर बाराच्या भावात जाणे होईल अशीही भिती असल्यांने, नेमके काय करायचे? याचा विचार सुरू असल्यांने, उद्याचा कोंबड बाजार अंधातरीत आहे.

यापूर्वी मूल पोलिसांनी मंदा तुकूम येथील एका कोंबड बाजारावर धाड मारली होती. या धाडीत 3 लाखाच्या मुद्देमालासह तेरा आरोपींना अटक करण्यात आली होती, हे उल्लेखनीय

Post a Comment

Previous Post Next Post