लाखांदूर येथे भरधाव वाहनाने धडक दिल्याने सहा वर्षीय बालक गंभीर जखमी


लाखांदूर:- भरधाव वाहनाने धडक दिल्याने सहा वर्षीय बालक गंभीर जखमी झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील चप्राड येथी बसस्थानक परिसरात रविवारी घडली. बालकाला उपचारासाठी ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्रणय भाष्कर भुते (६) रा. चप्राड ता. लाखांदूर असे जखमी बालकाचे नाव आहे.प्रणय पहिल्या वर्गात शिकत असून रविवारी शाळेला सुटी असल्याने तो बसस्थानक परिसरात उभा होता. त्यावेळी भरधाव वाहनाने (क्र एमएच ३४ बीआर ८१४४) प्रणयला जबर धडक दिली. यात प्रणय गंभीर जखमी झाला आहे.

गावकऱ्यांनी तात्काळ त्याच वाहनाने उपचारासाठी लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रणयची प्रकृती गंभीर असल्याने ब्रह्मपुरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. लाखांदूर पोलिसांनी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post