सालेभट्टी येथे शोष खड्ड्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करून ग्रामपंचायतला लावला चांगला चुना - नागरिकांची चौकशीची मागणी


धानोरा : प्राप्त झालेल्या माहितीनुसार धानोरा तालुक्यातील मुस्का ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सालेभट्टी येथे शोष खड्ड्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.


सविस्तर माहिती अशी आहे की शासनाच्या वतीने प्रत्येक गावोगावी ग्रामपंचायतच्या वतीने शोष खड्डे निर्माण केले जात आहेत. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल याकरिता हे बनवलेले जात आहेत. परंतु धानोरा तालुक्यातील मुस्का ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक दोन मध्ये सालेभट्टी या गावांमध्ये शोष खड्डा बघितला असता प्रतक्ष त्या शोष खड्डयावर कुठलाही सिमेंटचा पक्का स्लब न टाकता थातुरमुतुर त्या खड्याच्या वर लाकडी बांबू आणि सिमेंटच्या खाली चुंगळ्या लाऊन वरून सिमेंटचा प्लास्टर मारण्यात आला आहे.

व्हिडियो जरूर बघा
👇👇👇👇👇


अश्या प्रकारे सबंधित ठेकेदार शासनाला चांगलाच चुना लावण्याचा काम करत असतो . त्यामुळे ग्रामपंचायत सबंधित ठेकेदारावर काय कारवाई करते जनतेचे लक्ष लागलेले आहे. अन्यथा या विषयी ग्रामपंचायतला जॉब विचारण्यात येईल असे नागरिकांनी कळविले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post