संभाजी राजांची बदनामी कशी व का करण्यात आली ?



शिवरायांनी संभाव्य धोका ओळखूनच संभाजी राजांना रायगडावर ठेवले नव्हते.
पण ब्राह्मण मंत्र्यांनी संभाजी राजांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालूच ठेवले.
१७ जून १६७४ रोजी जिजाऊ साहेबांचे निधन झाल्यामुळे ब्राह्मण मंत्र्यांना गृहकलहात तोंड खुपसण्याची संधी मिळाली.
तोपर्यंत जिजाऊंचा दरारा सर्वत्र होता .
जिजामाता या संभाजी राजांचे सर्वात मोठे छत्र कालवश झाले.
शिवाजी राजांच्या व्यग्रतेमुळे मंत्र्यांनी संभाजी राजांना सळो की पळो करुन सोडले.
मोरोपंत, आण्णाजी दत्तो, पंरल्हादपंत, राहोजी सोमनाथ , ऊमाजी पंडीत आणि केशव पंडीत यांनी संभाजी राजांना बदनाम करण्याची मोहीम हाती घेतली.
शिवाजी राजे दक्षिनेत असतानाच ब्राह्मण मंत्र्यांनी गृहकलह निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
सोयराबाईंना हाताशी धरुन सावत्रपणा जागवण्याचा प्रयत्न केला.
पण त्यात त्यांना यश आले नाही.
कारण सोयराबाईंचे राजारामाइतकेच संभाजी राजांनवर प्रेम होते.
सोयराबाईंनी कधीही सावत्रपणाची जाणीव होऊ दिली नाही.
 मंत्र्यांनी अफवा उठवली की,
संभाजी राजे राजारामाचा द्वेष करतात.
भविष्यात राजारामाला फार मोठा धोका आहे ', असा अपप्रचार मंत्र्यांनी केला.
पण या बदनामीचे मंत्र्यांना यश आले नाही.
त्यानंतर त्यांनी डावपेच बदलले पण उद्देश बदलला नाही.
संभाजी राजे मद्यप्राशन करतात अशी अफवा त्यांनी उठवली.
त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला सुरुवात केली.
पवरीवर्तन वादी समाज सुधारकांचे चारित्र्य हणन कारण हे ब्राह्मणांचे सर्वात मोठे हत्यार आहे.
बहुजनांच्या महापुरुषांना बहुजनांपासून तोडण्यासाठी ब्राह्मण हे बहुजनांच्या अराध्य दैवतांचे नेहमी चारित्र्य हणन करतात.
यासाठी बहुजन मराठ्यांनी सावध रहावे.
दक्षिण दिग्विजय करुन शिवाजी राजे जेव्हा रायगडावर आले, तेव्हा राजांचे स्वागत करण्याऐवजी मंत्री संभाजी राजांबाबत तक्रार करण्यासाठी राजांकडे गेले.
त्यांनी राज्याकडे पुढील तक्रार केली.
"संभाजी प्रजेला महसुलात सुट देतात आणि आमचा उपहास करतात."
या तक्रारीत संभाजी राजांचे उदात्त सदगुण ओतप्रोत भरलेले आहेत.
प्रतिकूल परीस्थीती असणा-यांना संभाजी राजांनी महसुलात सवलत दिलेली होती.
हे लोक हीताचे काम संभाजी राजांनी केले होते.
रायगडावर राजे नसल्यामुळे मंत्री प्रजेचा छळ करत होते.
त्यामुळे ब्राह्मण मंत्र्यांना कंटाळलेली प्रजा न्यायासाठी संभाजी राजांनकडे आली.
त्यावेळेस राजांनी प्रजेला प्रेमात वागवले व जुलमी मंत्र्यांना सज्जड दम भरला.
म्हणूनच मंत्री म्हणतात की संभाजी राजे आमचा उपहास करतात.
संभाजी राजांनी स्वराज्य द्रोही मंत्र्याची दादागिरी संपवली.
शिवाजी राज्यांच्या पश्चात सर्व राज्य कारभार शृंगारपूरला चालत होता म्हणूनच सर्व ब्राह्मण मंत्री चिडले व त्यांच्याबाबत त्यांनी गरळ ओकायला सुरूवात केली.
बहुजणांच्या परीवर्तनाचे काम संभाजी राजांनी सुरु केले म्हणूनच मंत्र्यांनी त्यांची बदनामी सुरु केली.
शिवाजी राज्यांच्या पहिल्या राज्यभिषेकाच्या प्रसंगी ब्राह्मण मंत्री आणि गागाभट्टाने राजांचा क्रूर पणे छळ केला.
वैदिक धर्म हा बहुजनांना घातक आहे. 
म्हणूनच राजांनी दूसरा राज्यभिषेक २४ सप्टेंबर १६७४ ला शाक्त पंथीय निश्चवपुरी गोसावीच्या मार्गदर्शणाखाली केला.
तेव्हापासून सर्व ब्राह्मण राजांवर चिडलेले होते.
ब्राह्मणांनी राजांचा केलेला छळ संभाजी राजांच्या मनावर चांगलाच कोरला गेला.
म्हणून शुंगारपूरला असताना संभाजी राजांनी धर्मशास्त्राचे सखोल अध्ययन केले.
संभाजी राजांना उसंत मिळाली असती तर शिवसुत्र, शिवनीतीचा शिवधर्म त्यांनी त्यावेळेसच स्थापन केला असता.
म्हणजे त्यांनी वेद आणि वैदिकांना नाकारले ,
वैदिक धर्माच्या दहशतवादातून त्यांनी स्वत:ला व प्रजेला स्वतंत्र केले.
म्हणूनच ब्राह्मण खवळले व त्यांनी संभाजी राजांची बदनामी सुरु केली.
त्यांची बदनामी करण्यासाठी ज्यांचा वापर करण्यात आला.
त्यामागची वस्तुस्थीती पाहूया.
कथा , कादंबरी , नाटक , चित्रपट आणि दूरदर्शनावरील मालिका म्हणजे खरा इतिहास नव्हे.
नाटक कादंबरीकारांनी तुळसा , कमळा , गोदावरी , झेबुन्निसा , झिअतुन्निसा ई. नायिकांचा वापर करुन त्यांची बदनामी केलेली आहे.
त्याची शहानिशा करु.

तुळसा :- तुळसा नावाची कोणतीही स्त्री संभाजी राजांच्या काळात नव्हती.
तुळसा हे पात्र कोणत्याही ऐतिहासिक साधनात सापडत नाही.
मग तुळसा या पात्राचा उगम केव्हा झाला ?
नाटककार आत्माराम मोरे यांनी श्री छत्रपती संभाजी हे संगीत नाटक १८९१ साली लिहिले.
मोरे यांनी मनुवादी अपप्रचाराला बळी पडून तुळसा या पात्राला जन्म दिला व संभाजी राजांची बदनामी त्यांच्या मरणोंत्तर १८९१ पासून तुळसा नावाद्वारे केली.

कमळा:- कमळा नावाची स्त्री देखील संभाजी राजांच्या जीवनात कोठेही आलेली नाही.
कमळा या पात्राला कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही.
तरी ही पन्हाळा येथे कमळेची समाधी दाखवली जाते.
कमळेची जी समाधी दाखवली जाते ती कमळेची नसून बाळा विश्वनाथ भट यांचेबरोबर लढताना धारातीर्थी पडलेल्या यशवंतराव थोरात व गोंडाबाई थोरात या दांपत्यांची आहे.
म्हणजे बदनामी करण्यासाठी कमळेची समाधी म्हणून थोरातांच्या समाधीचा वापर करण्यात आला. 
कवी बी ने तर कमळेवर प्रदीर्घ कविताच लिहिली.
ब्राह्मण कवी लेखकांनी शिवाजी राजे, संभाजी राजे यांची सातत्याने बदनामी केली.
त्यामुळे ब्राह्मण लेखकांनी लिहिलेली पुस्तके जाळावीत.
अशाप्रकारे बदनामी करणा-या कथा , 
कादंब-या , चित्रपट , नाटकाला बळी पडलेल्या रसिक बांधवांना विनंती की खरा इतिहास वाचा ( श्रीमान योगी , छावा , या कादंब-या आहेत इतिहास नव्हे )
गोदावरी हे पात्रच नाही. मग संभाजी राजांनची बदनामी करण्यासाठी गोदावरी या पात्राला जन्म कोणत्या मानसाने दिला.
तर त्याचे नाव आहे प्रा. वसंत कानेटकर.
वसंत कानेटकरांनी गोदावरी हे पात्र निर्माण केले .

पोर्तुगीजांचा पराभव आणि संभाजींची दारु :-
संभाजी राजांनी पोर्तुगीजांना पराभूत केल्यानंतर शरणागत पोर्तुगीजांनी संभाजी राजांशी तह केला.
त्या तहाद्वारे दोन पिंप दारु संभाजी राजांना देन्याचा करार झाला. 
ती दारु तोफेची दारु होती.
पिण्याची नव्हे.

संभाजी राजांचा कंठा आणि अकबराची रखेली :- औरंगजेबाबरोबर बंड करुन संभाजी राजांच्या आश्रयाला आलेल्या अकबराला संभाजी राजांनी भेटी दखल सोन्याचा कंठा दिला होता.
तो अकबराने त्याच्या रखेलीला दिला.
ही घटना संभाजी राजांना कळताच अकबराला दिलेल्या सवलती राजांनी बंद केल्या.
याचा अर्थ संभाजी राजे स्वत: चारित्र्य संप्पन्न होतेच.
पण मित्रांनी ही चारित्र्य संप्पन्न असावे.
हा त्यांचा आग्रह होता.

झेबुन्निसा- झिअतुन्निसा :- या औरंगजेबाच्या कन्या होत्या .
संभाजी राजांची बदनामी करण्यासाठी बखर-नाटक कारांनी सांचाही वापर केला.
पण संभाजी राजांचा आणि झेबुन्निसा आणि झिअतुन्निसांचा कसलाही संबंध नव्हता.
झिअतुन्निसा ही संभाजी राजांनपेक्षा १४ वर्षांनीतर झेबुन्निसा ही १९ वर्षांनी मोठी होती.
त्यांनी एकमेकांना कधीही पाहिले नाही.
आग्राभेटी वेळी पाहीले असेलतर संभाजी राजांचे वय तेव्हा ८ ते ९ वर्षे असावे.
अशा प्रकारे निष्कलंक संभाजी राजांची बदनामी करण्यात आली.

 संभाजी बिडी :- संभाजी राजांना सुपारीचे सुंध्दा व्यसन नव्हते संपूर्ण आयुष्यात दारुला स्पर्ष देखील केला नाही.
कारण...

 " बुधभूषण " लिखीत आपल्या ग्रंथात राजा कसा असावा याबाबत शंभु राजे लिहितात :-
मेधावी मतिमान, दीनवंदनो, रक्ष: क्षमावान, त्र्यजु : ।
धर्मात्मा, अपिअनसूयको, लघुकर: षाडगुण्यविद, शक्तिमान ।। 
उत्साही ,पररंध्रवित, कृतधित: वृद्धिक्षयस्थानविद ।।
शुरो, नव्यसनी, स्मरति उपकृतं, वृद्धोपसेवी 
च य: ।। अ -२.२

अर्थ :- द्न्यानी, गरीबांच्या दु:खांना बोलके करणारा, सरळ मनाचा द्वेष न करणारा,
अल्पकार, घेणारा,शक्तिमान, दुसर्यांचे इंगित जाणनारा,
शत्रुदोष जाणनारा, धैर्याने कुठे जोराने तर कुठे माघारी घ्यायची याची जान असलेला, उत्साही,
शुर,निरव्यसनी,रयतेवर प्रेम करणारा असा राजा असावा.

संभाजी बिडी:- संभाजी राजांना सुपारीचे सुंध्दा व्यसन नव्हते.
धूम्रपान करणा-याची संगतदेखील संभाजी राजांनी केली नाही.  
तरीही अशा निर्व्यसनी संभाजी राजांचे नाव बिडीला देऊन निष्कलंक महापुरुषाची फार मोठी बदनामी बिडी उत्पादकाने केलेली आहे.
त्यांच्या काळात कोणत्याही प्रकारची बिडी नव्हती.
असलीच तर त्यांचा बिडीशी कसलाही संबंध नाही.
अशा चारित्र्य संप्पन्न निर्व्यसनी राजाचे नाव बिडीला देऊन बिडीवाले त्यांची पावलो पावली बदनामी करत आहेत.
 हा सामाजीक व राष्ठ्रीय गुन्हा आहे.
या गुन्हेगारांवर शासनाने कठोर कारवाई करावी व संभाजी राजांची बदनामी मरणोत्तर तरी थांबवावी.
आणि बिडीवाल्यांनी बिडीचे नाव बदलुन स्वत:च्या नावावर ती
 खपवावी ...

संदर्भ :- 
 श्रीमंत कोकाटे लिखीत 
" छत्रपती संभाजी महाराज "

Post a Comment

Previous Post Next Post