एटापल्ली पोलिसांनी कारसह दारू केले जप्त


गडचिरोली :-  एटापल्ली पोलिसांनी सापळा रचून कारमधील 82 हजारांची दारु व 2 लाख रुपयांची कार जप्त केली.


पोलिसांची चाहूल लागताच आरोपी कार सोडून पसार झाला. गुरुवारी रात्री 9 वाजता पोलिसांनी इंदिरा वॉर्ड क्रमांक 10 मध्ये सापळा रचला होता. आरोपी कैलास याने त्याच्या घरासमोर गल्लीत कार उभी केली. त्याला पोलिसांची चाहूल लागल्याने भिंतीवरुन उडी टाकून तो पसार झाला. पोलिसांनी कारमधील देशी-विदेशी अशी एकूण 82 हजार रुपयांची दारु व दोन लाख रुपयांची कार असा 2 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास ठाणेदार विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक रविराज कांबळे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post