वृद्धापकाळ पेंशन योजनेतील २०० रुपये गहाळ प्रकरणाची चौकशी करण्यात यावी*



*काँग्रेस कार्यकर्ते पिंकु बावणे यांची तहसीलदारांकडे मागणी*

देसाईगंज-
  मागील अनेक वर्षांपासून निराधार,निराश्रीत व वृद्धांना केंद्र व राज्य शासनाच्या वतीने १ हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे.माञ मागील काही महिन्यांपासून काही वृद्धांच्या बँक खात्यात वृद्धापकाळ पेंशन योजनेचे ८०० च रुपये वळते करण्यात येत असल्याने २०० रुपये गहाळ प्रकरणाची सखोल चौकशी करून वृद्धांना न्याय देण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्ते पिंकु बावणे यांनी देसाईगंजचे तहसीलदार संतोष महले यांना दिलेल्या निवेदनातुन केली असल्याने संबंधित विभागात एकच खळबळ माजली आहे.
     दिलेल्या निवेदनात बावणे यांनी म्हटले आहे की देसाईगंज तालुक्यातील अनेक गोरगरीब निराधार,वृद्धांना केंद्र व राज्य शासनाच्या वतीने १ हजार रुपये प्रती महिणा अनुदान देण्यात येत आहे.असे असले तरी काही लाभार्थ्यांना १ हजार रुपये प्रती महिणा बरोबर मिळत आहे तर अनेक लाभार्थ्यांना मागील अनेक महिण्यांपासुन फक्त ८०० रुपयेच प्रती महिणा अनुदान त्यांच्या बँक खात्यात वळते करण्यात येत आहेत.
     याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने देय शासकीय अनुदानाच्या रकमेची अफरातफर केल्या जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.सदर अनुदानाची रक्कम गोरगरीब, निराधार, निराश्रीत व वृद्धांना देण्यात येत असुन अनेकांचे उदरनिर्वाह याच भरोशावर अवलंबून असताना आपल्या कार्यालया अंतग॔त संबंधित लाभार्थ्यांची थट्टा चालविली जात आहे.लाभार्थ्यांचे २०० रुपये जातात कुठे ही गंभीर बाब लक्षात घेता या प्रकरणाची सखोल चौकशी करून कर्तव्यात हयगय करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांना सर्वस्वी जबाबदार धरुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी व शासकीय स्तरावरुन देण्यात येत असलेल्या अनुदानाची देय रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वळती करावी. अन्यथा विरोधात तहसिल कार्यालयात घेराव आंदोलन करण्यात येईल व दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील,असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
     निवेदन तहसीलदार यांचे प्रतिनिधी यांनी स्विकारले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते पिंकू बावणे,राजू गराडे,नरेश लिंगायत,आयुष्य सतवानी, विकी खोब्रागडे,कल्पना वासनिक, जयश्री मेश्राम आदी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post