नकली दारूचा कारखाना टाकायचा आहे.. मग चला चंद्रपूर जिल्ह्यात


चंद्रपूर: जिल्ह्यातील दारूबंदी होण्यासाठी सर्वात मोठा लढा उभारणाऱ्या श्रमिक एल्गार संघटनेचे मुख्यालय असलेल्या मुल तालुक्यातील चीतेगाव येथे अवैध देशी दारू निर्मितीच्या मोठ्या कारखान्यावर धाड घालुन राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. ह्या प्रकरणात विशिष्ट राजकीय नेत्यांचे अर्थपुर्ण आशीर्वाद असल्याची जोरदार चर्चाही जिल्हाभर सुरू होती. ह्या कारवाई नंतर अवैध बनावट देशी दारूवर अंकुश बसेल अशी अपेक्षा असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुल तालुक्यातच पुन्हा एकदा मोठी कारवाई करत परत एकदा बनावट देशी दारू निर्मिती कारखाना उध्वस्त केला आहे.

प्राप्त माहितीनुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक चंद्रपुर गडचिरोली कार्यालयाला मुल तालुक्यातील चक बोर्डा गावातील ललिता प्रेमानंद कांबळे ह्यांच्या चाक मोड येथिल मालकीच्या शेतातील घरात मोठ्या प्रमाणात बनावट देशी दारू तयार करून खऱ्या दारूच्या बाटली प्रमाणे वेष्टन लाऊन विविध ठिकाणी ही बनावट देशी दारू विक्रीसाठी पाठविण्यात येत असल्याची माहिती मिळाली.

आज दिनांक १७/०२/२०२३ रोजी मौजा वलनी-चकनिंबाळा मार्गावरील चक मोड, ता.जि. चंद्रपुर या ठिकाणी बनावट देशी दारु निर्मितीच्या कारखान्यावर छापा टाकून बनावट देशी निर्मातीचा कारखाना उद्धस्त करण्यात आला. सदर गुन्यामध्ये एकूण १,५३,३००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व घटनास्थळी उपस्थित शशिम प्रेमानंद कांबळे याला अटक करून मुंबई दारुबंदी कायदा १९४९ व भा.दं.वि. सहिता चे कलम ३२८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post