दुचाकी अपघातात एक ठार, तर दुसरा जखमी



कुरखेडा : दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात युवक ठार झाला, तर दुसरा जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास कूरखेडा-मालेवाडा रोडवरील चिचेवाडा गावाजवळ घडली.

अर्जुन मडावी (२५, रा. येरंडी) असे मृतकाचे तर आकाश पुराम असे जखमीचे नाव आहे. तालुक्यातील पूर येथे मंडईचे आयोजन करण्यात आले होते. येडापूर येथील मंडई बघून अर्जुन व त्याचा साळा आकाश पुराम दुचाकी वाहनाने येरंडी येथे परत येत आहे.

होते. दरम्यान, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात अर्जुन मडावी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला आकाश पुराम यांना गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच चांदोणा, चिचेवाडा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी उपसरपंच रेमाजी किरणापुरे यांनी उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे घटनेची माहिती देऊन रुग्णवाहिका बोलाविली. आकाशला गडचिरोली येथे रेफर करण्यात आले


Post a Comment

Previous Post Next Post