रेशन दुकानाचा गडचिरोलीला जाणारा 11 लाखाचा तांदूळ जप्त


नागपूर :- पोलीसगुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक २ च्या पथकाला रेशनचा तांदूळ नागपुरात येत असून तो गडचिरोलीला जाणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी काटोल नाक्याजवळ सापळा रचला. अमरावतीचे पासिंग असलेला ट्रक येतांना दिसला. पथकाने ट्रकला थांबवून त्याची तपासणी केली असता; त्यात सुमारे ११ लाख किंमतीचे ३५० क्विंटल तांदूळ होता व पोलीसांनी ट्रकसह २१ लाखांचा माल जप्त केला आहे. शेख अकील या चालकाने व अमजद खान या क्लीनरने तांदळाबाबत उडवाउडवीची व दिशाभूल करणारी उत्तरे दिली. अमरावती येथील रशीफ नावाच्या व्यक्तीच्या मालकीचा तांदूळ असल्याचा दावा शेखने केला.मात्र मालकाने कुठलेही दस्तावेज आणून दिले नाही. संबंधित तांदूळ काळाबाजाराचा होता व तो गडचिरोलीला अवैध विक्रीसाठी नेण्यात येत होता. गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post