जगात बुध्दच आठवतो...!



-----------------------------------------------------
भारतात राम मंदिरावरून लोकांची कत्तली करणारे व सतत रामनामाचा जपमाळ ओढणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत संयुक्त राष्ट्र संघात संबोधित करताना आम्ही जगाला युध्द नाही तर बुध्द दिला आहे, जगाला शांततेचा संदेश दिला आहे असे सांगितले. यावरून जगात भारताची ओळख बुध्दांचा देश अशीच आहे. परंतु आरएसएसच्या मुशीतून तयार झालेले हेच मोदी भारतात मात्र रामनामाची जपमाळ ओढतात. जागतिक पटलावर आम्ही रामाच्या देशातून आलो आहोत असे सांगितले तर लोक विचारतील कोण राम आणि परशुराम...!


तथागत बुध्दांनी वर्णव्यवस्थेविरोधात लढा दिला. बुध्द धम्म जगात सर्वश्रेष्ठ का? याचा विचार करायला हवा. बुध्दांनी ४६ वर्षे पायी मौखिक प्रचार व प्रसार केला. जगातील पहिले वैज्ञानिक बुध्द आहेत. बुध्दांना ६६ वैज्ञानिकांनी आपला गुरू मानला. आईनस्टाईनपासून ते आजच्या अमर्त्य सेन यांच्यापर्यत. 



जगातील पहिल्या क्रमांकाचे कुशल संघटक बुध्द होते. त्यांनी पहिली केडर बेस ऑर्गनायझेशन भिक्खू संघ बनवला. अत्युच्च असा वैज्ञानिक दृष्टीकोनावर आधारित त्यांनी बुध्द धम्म दिला. कुठल्याप्रकारे शाळेत न गेलेल्या बुध्दांनी आपल्या अनुभवालाच संदर्भ ग्रंथ मानून जगात क्रांती केली. 



बुध्दगयात पिंपळ या वृक्षाखाली त्यांनी चिंतन केले. पिंपळाचे झाड दोन्हीवेळा ऑक्सिजन देते. यावरून बुध्द केवढे मोठे वैज्ञानिक होते हे लक्षात येते. परंतु पिंपळाच्या झाडाला काऊंटर म्हणून ब्राम्हणांनी वडाचे झाड आणले. आज त्याच वडाच्या झाडाला हाच नवरा जन्मोजन्मी मिळो म्हणून (बेवडा असला तरी) महिला फेर्‍या मारताना दिसतात.


बुध्दांनी दु:ख या विषयावर पाच वर्षे चिंतन केले. त्यावेळी त्यांनी ब्राम्हणी व्यवस्थेच्या सर्व थोतांडी कल्पना नाकारल्या. त्यांनी तीन प्रकारचे दु:ख सांगितले. या दु:खावर मात करण्यासाठी उपायदेखील सांगितला. एक व्यक्तीगत, दुसरे सामूहिक तर तिसरे नैसर्गिक दु:ख. व्यक्तीगत दु:ख निवारण्यासाठी पंचशील, सामूहिक दु:ख निवारण्यासाठी अष्टांगिक मार्ग व नैसर्गिक दु:ख निवारण्यासाठी दहा पारमिता सांगितल्या.


बुध्दांची क्रांती यशस्वी का झाली? तर त्यांनी लोकांची लढाई लढली. त्यावेळी त्यांनी पशुहत्या आंदोलनाचा मुद्दा बनवला. कारण त्यावेळी पशुहत्या म्हणजे गोहत्या ब्राम्हण करत होते. केवळ गोहत्या करतच नव्हते तर त्याचे मांसही खात होते. गोहत्या केल्यामुळे बैलांची पैदास कशी होणार? बैलांची पैदास न झाल्यामुळे शेतकरी शेती कसा करणार? असा मुद्दा ते लोकांना पटवून सांगायचे. अरे..हा तर आपलाच मुद्दा आहे. म्हणून लोक बुध्दांच्या आंदोलनात सहभागी होत होते. 



हाच गोहत्येचा मुद्दा आज ब्राम्हणांनी बनवला आणि सर्वसामान्य नागरिकांची मॉब लिचिंगच्या नावाखाली कत्तली करत सुटले आहेत. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’चा नारा दिला तो सर्वप्रथम बुध्दांनीच! कमीतकमी ३ वेळा आणि जास्तीत जास्त १५ वेळा बुध्द एकाच प्रश्‍नाचे उत्तर द्यायचे. बुध्दांनी निर्माण केलेल्या भिक्खू संघात बाम्हणांनी घुसखोरी केली. विचारधारेत, सैन्यात, प्रशासनात घुसखोरी केली. पुश्यमित्र शुंगाच्या रक्तरंजित प्रतिक्रांतीमुळे पुन्हा एकदा जातीव्यवस्था निर्माण झाली. क्रमिक असमानता निर्माण झाली. ती आजही कायम आहे.


मोदी आज युनोमध्ये तथागत बुध्दांची आठवण करून देतात परंतु मोदी ज्यांच्या मुशीतून तयार झाले आहे त्या आरएसएसला बुध्दांचे वावडे आहे. आरएसएसच्या सांगण्यावरून मोदींसारखा माणूस नेहमीच मुस्लिमांविरोधात गरळ ओकतो. २००२ च्या गोध्रा हत्याकांडात याच मोदींचे नाव होते. म्हणजे भारतात राम-परशुरामाचा जप करायचा आणि जगात बुध्दांची आठवण सांगायची हा मोदींचा दुटप्पीपणा आहे. 



बुध्दांची जगात ओळख आहे. राम-परशुरामाला कोणी ओळखत नाही. भारतात बुध्दांचे ऍरॅकॉलॉजिकल पुरावे सापडतात. परंतु रामाचे अथवा परशुरामाचे सापडत नाहीत. देशातील मोठमोठी मंदिरे ही बुध्द स्थळ आहेत. परंतु त्या बुध्दस्थळांवर ब्राम्हणांनी अनियंत्रित कब्जा केला आहे. मोदींनी बुध्दांचे नाव घेतले असले तरी बुध्दांच्या तत्वज्ञानाविरोधात त्यांचे सरकार काम करत आहे. 



स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही तत्वे बुध्दांची आहेत. तीच तत्वे विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या राज्यघटनेत अंगिकारली आहेत. मग भारतात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय आहे का? असा प्रश्‍न निर्माण होतो. गेल्यावर्षी ९ ऑगस्टला जंतर-मंतरवर ११ ब्राम्हणांनी संविधान जाळले त्याविरोधात याच मोदींनी ‘ब्र’ देखील काढला नाही. संविधान जाळणे म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय नाकारणे होय. म्हणून मोदींना बुध्दांचे नाव घेण्याचा अधिकारच नाही.


युनोमध्ये मोदींनी बुध्दांचे नाव घेऊन तेथील लोकांना फसवले आहे. आणखी एक त्यांनी खोटेच सांगितले. यावर्षी जगातील सर्वात मोठी निवडणूक झाली. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रातील जनतेने सर्वाधिक मत देऊन मला व माझ्या सरकारला पहिल्यापेक्षा जास्त जनादेश दिला. 



जगातील सर्वात मोठे स्वच्छता अभियान भारतात पार पडले. केवळ पाच वर्षांमध्ये जनतेसाठी ११ कोटींपेक्षा जास्त स्वच्छतागृह तयार करून, एका विकसनशील देशाने जगाला स्वच्छतेचा संदेश दिला. २०२० पर्यंत आम्ही गरिबांसाठी आणखी दोन कोटी घरांची व्यवस्था करणार असल्याचे सांगत, २०२५ पर्यंत भारतला टीबी मुक्त करण्यासाठी काम करत आहोत अशा अनेक थापा मारताना आपण ईव्हीएम घोटाळा करून सत्तेवर आलो आहोत यावर भाष्य करण्यास मात्र मोदींनी टाळले. 



एक बाजूला युनोत बुध्दांचे तत्वज्ञान सांगायचे आणि दुसर्‍या बाजूला लोणकढी थाप मारायची अशी दुप्पटी भूमिका मोदींनी घेतली. त्यामुळे मोदींचा विखारी चेहरा समोर आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post