नवरा बायकोचं भांडण मिटवण्यासाठी पोलिसांची भन्नाट आयडिया, पाहा काय केलं?


उत्तर प्रदेश : लग्न म्हटलं की दोन व्यक्ती त्यांचे कुटुंब एकत्र येतात. दोन व्यक्ती एका बंधनात येणार म्हटल्यावर थोडे मतभेद हे होणारच. मात्र काही नवरा बायकोंमधील वाद एवढा वाढतो की तो चव्हाट्यावर आल्याशिवाय राहत नाही. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आला असून हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण कशा प्रकारे हाताळलं हा चर्चेचा विषय ठरत आहे.

उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात पोलिसांनी पती-पत्नीमधील 6 महिन्यांपासून सुरू असलेला वाद तर सोडवलाच, शिवाय त्यांचे पुन्हा लग्नही करून दिले. मात्र, यावेळी लग्नात बाराती आणि जाणती दोघेही पोलीस होते. पती पत्नीमध्ये परस्पर समझोता झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचे मंदिरात लग्न लावून दिले व पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर दोघांनाही पोलीस ठाण्यातून निरोप देण्यात आला. हे संपूर्ण प्रकरण इमलिया सुलतानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.

उषा नावाच्या मुलीचे लग्न सुमारे एक वर्षापूर्वी विशाल गुप्ता नावाच्या मुलाशी झाले होते, मात्र लग्नानंतर काही महिन्यांनी विशाल आणि उषा यांच्यात काही कारणावरून भांडण झाले. विशालनेही त्याचे लग्न त्याच्या इच्छेविरुद्ध झाल्याचे सांगण्यास सुरुवात केली. त्यामुळे पती पत्नीमध्ये रोज भांडणे होत होती, त्यानंतर उषा माहेरी परतली.घरी परतल्यानंतर तिने पोलीस ठाण्यात सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केली, ज्यात सुलतानपूरचे प्रभारी निरीक्षक मनीष सिंह यांनी फोन केला. उषा आणि विशालच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही कुटुंबांना बसून बोलण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दोघांनीही एकमेकांसोबत राहण्याते मान्य केले.पोलिसांनी उषा आणि विशालचे पुन्हा लग्न लावून दिले. दोघांनी पोलीस ठाण्याच्या आवारत असलेल्या मंदिरात सप्तपदी घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post