धक्के खायचे आहे का ?... चला मग गडचिरोली कठानी नदीच्या पुलावर


गडचिरोली :- एवढ्या फास्ट आणि नव्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण कधी ऐकले नसेल असे स्वागत गडचिरोली जिल्ह्याच्या सुरुवातीलाच मोठ्या उत्साहात, आनंदात व जोमाने आदळून- आपटून केले जाते.यासाठी हातात हार लागत; ना कुणाची वाट पाहावी लागत.बस्स फक्त एखादे वाहन पाहिजे. दुचाकी असो की चारचाकी वाहन असो.

स्वागत करणारी सध्या स्थितीतील खरी घटना असून देसाईगंज- आरमोरी मार्गे गडचिरोली जात असतांना कुठल्याही प्रकारचे स्वागत केले जात नाही. मात्र गडचिरोली जवळील कठानी नदीवरील पुलाजवळून गेल्यास स्वागत नक्कीच केला जातो आहे.

स्वागत कसे केले जाते जाणून घेऊया; काल ११ फेब्रुवारी २०२३ रोजी दुचाकीने आरमोरी येथून गडचिरोली येथे प्रवास करतेवेळी कठानी नदी पुलावरून जात असतांना मुख्य डांबरीकरण रस्ता एवढा खराब झाला की दुचाकी वाहन, चारचाकी वाहन व महामंडळाची बस सुद्धा आदळत- आपटत, धक्के खात जाऊन; विना माळ घेऊन स्वागत केले जात असल्या सारखे वाटत असूनही याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने याचे नवलच वाटते आहे.

कठानी नदी पुलाजवळून ५० ते १०० मीटर अंतरावरील डांबरीकरण रस्ता खड्डेमय होऊन पूर्णपणे फुटलेल्या अवस्थेत झाला आहे. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या आगमनाच्या मुख्य मार्गावरच असे होत असेल तर बाकीच्या ठिकाणची अवस्था कशी? असा प्रश्न निर्माण होत आहे.

जिल्हा स्तरावर बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय,पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय व इतर संपूर्ण क्लास वन अधिकाऱ्यांची कार्यालये असूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने यांनाही आदळून-आदळून स्वागत करण्याची सवय तर झाली नसावी ना? सर्वसामान्य जनता यांना तर सवयच झाली; असल्याने यावर तोडगा निघणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

Post a Comment

Previous Post Next Post