कोंबड्याला वाचवताना स्वतःचा जीव गमावला , विहिरीत बुडून वृद्ध इसमाचा मृत्यू




 एटापल्ली: माणसाचा मृत्यू कुठे आणि कसा होईल याचा काहीच भरवसा नसतो. येथील एक वृद्ध इसम आपल्या कोंबड्यांचा जीव वाचविण्यासाठी विहिरीत उतरला. पण हे करताना स्वतः चा जीव गमावून बसला.

सोनू कारू पुंगाटी (७० वर्ष) असे त्या वृद्धाचे नाव आहे. येथील इंदिरा वाईतील रहिवासी असलेले पुंगाटी हे डाक विभागातील सेवानिवृत्त डाकपाल
होते. शनिवारी त्यांचा कोंबडा घराजवळील विहिरीत पडला. कोंबड्याचा जीव वाचवून त्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी ते विहिरीत उतरले.

कोंबड्याला पकडून त्यांनी विहिरीबाहेर ही फेकले. त्यामुळे कोंबडा तर वाचला, पण या गडबडीत विहिरीतील पाण्यात पडून सोनू पुंगाटी यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे हा परिसरात चर्चेचा विषय झाला.

Post a Comment

Previous Post Next Post