मद्यप्राशनाने घेतला बळी





खोब्रागडी नदीपात्रात आढळला मृतदेह

 वैरागड : येथील गोरजाई डोहाच्या खालील भागात खोब्रागडी नदीपात्रात अतिमद्यप्राशन केल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

कालिदास लक्ष्मण मेश्राम (४५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याला दारूचे व्यसन असल्याने तो सतत दारूच्या नशेत असायचा. चार-पाच दिवसांपूर्वी दारूच्या नशेतच

नेहमीप्रमाणे तो नदीपात्राकडे फिरायला गेला असावा, आणि त्याच ठिकाणी पडून राहिला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्या भागात फिरणाऱ्या लोकांना कालिदासचा मृतदेह आढळून आला.

पोलिस पाटील गोरखनाथ भानारकर यांनी या घटनेची माहिती पोलिस स्टेशनला दिली. पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दादा भिल्लारी व सहकाऱ्यांनी पंचनामा केला.

Post a Comment

Previous Post Next Post