आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरांसह तालुक्यातील नागरिकांच्या प्रमुख मागण्यांच्या न्याय हक्कासाठी दिनांक १३ फरवरीला आरमोरी तहशिल कार्यालयांवर मोर्चा धडकणार





आरमोरी - गडचिरोली जिल्हयातील आरमोरी तालुका हा प्रगतशील तालुका असला तरी तालुक्यातील नागरिक, भूमिहीन, शेतकरी महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिक विविध समस्यांशी त्रस्त असुंन त्यांचे तात्काळ निराकारण करण्यात यावे, अन्यथा आरमोरी तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात नागरीकाचा शहरांसह तालुक्यातील प्रमुख मागण्यांच्या न्याय हक्कासाठी 
 दिनांक १३ फरवरी २०२३ ला दुपारी ठीक १२.०० वाजता. राममंदिर ते तहसिल कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे यातील प्रमुख मागण्या .आरमोरी शहरातील हृदवाढ झालेल्या जमिनीच्या आखीव पत्रीका भोगवत दाराच्या नावे देण्यात यावे .शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे भारनियमन बंद करण्यात यावे .ग लाभार्थ्यांना तात्काळ घरकुल देण्यात यावे. प्रधान मंत्री, रामाई, शबरी घरकुल योजनेच्या लाभार्थ्याचे हप्ते तात्काळ देण्यात यावे.आरमोरी शरहात ओपन स्पेशसाठी जागा न सोडता शेतीच्या जमिनीवर सरसकट लेआउट पाहुन विक्री सुरू असल्याने त्यांची चौकशी करून त्यावर बंदी करण्यात यावी. आरमोरी नगर परीषदला नविन पाणी पुरवठा योजना मंजूर करावे. ७ पांदन रस्त्यांना विआर नंबर देवून मजबुतीकरण करण्यात यावे. विज विरतरन कंपनीने मिटर रिडींग करून कृषी पंपाचे बिले देण्यात यावे. १३००० हजार धडक सिंचन विहीर योजनेतील कार्यारंभ आदेश दिलेल्या शेतकऱ्यांना बांधकामासाठी अनुदान देयात यावे. तालुक्यातील विवध शासकीय कार्यालयातील रिक्त पदे भरण्यात यावे. आरमोरी येथे १०० खाटाचा दवाखाना मंजूर करण्यात यावा. बुरड कामगारांना वनविभागाने हिरव्या बांबूचा पुरवठा करण्यात यावा.आरमोरी येथील रामसागराचे खोलीकरण व सौदयी करण करणे वन जमिनीवर अतिक्रमण केलेल्या धारकांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे तसेच दोन तिन वर्षांपासून प्रशासनाकडे प्रलंबित असलेले वनपट्टे तातडीने निकाली काढण्यात यावे.गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित कृषी पंप साठी डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यात यावे जंगली हत्ती मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावे जंगल व्याप परिसरातील शेतकऱ्यांना संरक्षणासाठी उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांना चेंनलिंग फॅन्सीगची व्यवस्था करण्यात यावे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठी पर्यटन स्थळाचा विकास करावा वनावर आधारित रोजगार निर्मितीसाठी ठिकठिकाणी कुटीर उद्योग सुरू करण्यात यावे. यांसह विविध मागण्या घेऊन आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शहरातील व तालुक्यातील नागरिकांचा मोर्चा दिनांक १३ फरवरी दुपारी 12 वाजता राम मंदिर आरमोरी येथून तहसील कार्यालयावर धडकणार आहे या मोर्चाला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते व पदाधिकारी मोर्चात उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत 
तरी आरमोरी शहरासह तालुक्यातील शेतकरी शेतमजूर महिला युवक व नागरिकांनी हजारोच्या संख्येने मोर्चा उपस्थित राहावे असे आवाहन आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यानी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post