अज्ञात वाहनाच्या धडकेत शिक्षक भूनेश्वर लिल्हारे गंभीर जखमी


कुरखेडा : आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास कुरखेडा वडसा मार्गावर विद्याभारती महाविद्यालायाजवळ दुचाकी स्वाराला अज्ञान वाहनाची धडक लागल्याने श्रीराम हायस्कूल कुरखेडा येथील शिक्षक गंभीररीत्या जखमी झाले . जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव भूनेश्वर लिल्हारे वय ३८ वर्षे राहणार चिखली असे आहे.
प्राप्त माहितीनुसार भूनेश्वर चिखली वरून कुरखेडा कडे दुचाकी क्रमांक एम. एच. ३३ एन ७२०७ ने येत असतांना विद्याभारती महाविद्यालयाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्त्यावर कोसळले. घटनेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाला .

मार्गक्रमण करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीने त्याना उचलून दवाखान्यापर्यंत पोहचविण्याचे हिंम्मत दाखविली नाही. कुरखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते शहजाद हाश्मी व त्यांचे सहकारी यांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी एका खासगी वाहनाने घटना स्थळाकडे धाव घेतली.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व्यक्तीला उचलण्यासाठी कोणीही समोर येत नव्हता पण मोबाईलवर सदर घटनेचे चित्रिकरण करण्यास सगळेच आतुर असल्याचे तिथे पाहायला मिळाले. खासगी वाहनात जखमी व्यक्तीला नेन्याचा प्रयत्न केला असता पण वाहन लहान असल्याने त्यांना ठेवण्यात अडचण गेली. जखमीला रुग्णवाहिकेतून कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे पोहचते करण्यात आले.

डोक्याला गंभीर दुखापत असल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने गंभीर स्थितीमध्ये नागपूर येथे हलविण्याचा सल्ला येथील डॉक्टरांनी दिल्याने रुग्णालयात पोहचलेल्या नातेवाईकांनी त्यांना येथील रुग्णवाहिकेच्या मदतीने नागपूर कडे उपचाराकरिता नेल्याचे कळते.

भूनेश्वर लिल्हारे हे कुरखेडा येथिल श्रीराम हायस्कूल येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते रोजच्या प्रमाणे स्वगाव चिखली येथून कुरखेडाला शाळेत जाण्यासाठी निघाले होते अशी माहिती आहे. प्रेमळ आणि हसमुख स्वभावाचे असलेल्या भूनेश्वर सोबत हि दुर्दैवी घटना घडल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे..

Post a Comment

Previous Post Next Post