चामोर्शी तालुक्यातील दुर्गापुर व ईस्कॉन मंदिर या ठिकाणच्या ( सत्संग) हरिनामाचे अखंड कीर्तन, भागवत सप्ताहाच्या महापूजेच्या कार्यक्रमाला खासदार अशोकजी नेते यांची उपस्तीथी


दिनेश बनकर कार्यकारी संपादक
सुपर.फास्ट बातमी ७८२२०८२२१६


दिं १४ फेब्रुवारी २०२३

चामोर्शी:-खासदार अशोकजी नेते यांनी या भागवत,हरिनामाच्या अखंड कीर्तन सप्ताहाला भेट देऊन पूजा अर्चना करुन याप्रसंगी अध्यात्मिकतेचे विचार व्यक्त करतांना अशा या भागवत सप्ताहाच्या अध्यात्मिकतेमुळे मनाची एकाग्रता, चिंतन, अज्ञान दूर करून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशकडे नेण्याचा मार्ग व चांगले आचार विचारांची देवाण घेणं आध्यात्मिकता होय.
अध्यात्मिक जीवन हे खऱ्या अर्थाने ईश्वरीय असतं.परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वराप्रती कृतज्ञभाव प्रकट होऊन ईश्वराला जीवन समर्पित करणे आहे. त्यामुळे अशा या कार्यक्रमाचे आयोजन करणे आजच्या काळाची व जगाला, देशाला गरज आहे. असे विचार या प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी केले.

बंगाली समाजाच्या वतीने इस्कॉन मंदिर व दुर्गापुर येथे सत्संग हरिनाम अखंड कीर्तन या भागवत सप्ताहाच्या महापूजेला खासदार अशोकजी नेते यांनी भेट दिली असता या महापूजेचे पूजा अर्चना करून याप्रसंगी या भागवत सप्ताहाच्या कमिटीने खासदार अशोक जी नेते,प्रकाशजी गेडाम,स्वप्निलजी वरघंटे,आशिष पिपरे,या सन्माननीय व्यक्तीचे शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून मानसन्मानाने स्वागत करण्यात आले.

यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते, इस्कॉन टेंम्पलचे माननीय परमेश्वर प्रभू,भाजपाचे जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे,डॉ. कुंभारे साहेब,प्रदेश संघटन सरचिटणीस एस.टी मोर्चाचे प्रकाशजी गेडाम,प्रदेश सदस्य स्वप्निल वरघंटे,मार्कंडा देवस्थानचे अध्यक्ष भांडेकरजी,नगरसेवक आशिषजी पिपरे,भाजपाचे दुलालजी सरकार, विनोदजी गौरकर,रमेशजी अधिकारी, तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी व गावातील भाविक भक्त सप्ताहाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post