अजब गजब.. शिवीगाळ प्रकरणी अगोदर निलंबन मग ते रद्द आणि मग मग भलताच प्रताप


चंद्रपूर (वरोरा) :- वरोरा येथील वनविभागाच्या कार्यालयात तीन वर्षापूर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून मधुकर राठोड रुजू झाले. त्यांनी चांगल्या प्रमाणात वनातील गौण खनिज चोरी व इतर चोऱ्यांवर अंकुश बसविला होता. वनामधून रेती चोरी मोठ्या प्रमाणात होत होती. त्यावर त्यांनी रेती असलेली अनेक वाहने कार्यालयात लावून त्यांच्यावर मोठा दंड आकारण्यात आला होता. त्यामुळे रेती चोरी करणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत होती.मधुकर राठोड यांची कारकीर्द सुरळीत सुरू असताना, त्यांच्याच एका कनिष्ठ कर्मचाऱ्यासोबत त्यांची 'हमरी तुमरी' झाली. प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत गेले. त्यानंतर मधुकर राठोड प्रकाशझोतात आले. वनकर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याने कर्मचारी संघटना आक्रमक झाली. त्यामुळे मधुकर राठोड यांना निवृत्तीच्या दोन महिने आधी निलंबित करण्यात आले.३१ जानेवारी रोजी ते निवृत्त होणार होते. म्हणून ३० जानेवारीला त्यांचे निलंबन रद्द करून त्यांना रुजू करण्यात आले व ३१ जानेवारीला सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला.

सेवानिवृत्तीच्या दोन महिन्यांपूर्वी निलंबित करून सेवानिवृत्ती दोन दिवस शिल्लक असताना निलंबन रद्द करण्यात आले आणि त्याच दिवशी रुजू करून घेतले आणि दुसऱ्या दिवशी अधिकारी सेवानिवृत्त झाले. वनविभागातील एका अधिकाऱ्याचा हा प्रवास आश्चर्यकारकच ठरला.

Post a Comment

Previous Post Next Post