असा निर्णय इतर ग्रामपंचायत घेतील का?...


नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील (Kandhar) पाताळगंगा या ग्रामपंचायतीने ग्रामसभा (Grampanchayat gramsabha) आयोजित करुन व्यसनमुक्तीचा ठराव घेतला आहे. गावात दारू, सिगारेट, गुटखा, तंबाखू खाताना आढळल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आल्याने संपुर्ण नांदेड जिल्ह्यात गावाची मोठी चर्चा आहे. विशेष म्हणजे व्यसनमुक्तीचा निर्णय घेतल्यामुळे ग्रामस्थांचं कौतुक देखील करण्यात येत आहे. गावातील मुलं अधिक व्यसन करीत असल्यामुळे गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे.


2 हजार लोकसंख्येच्या गावात तरूणं मुल देखील व्यसन करत आहेत. व्यसनमुक्तीसाठी अनेकांनी प्रयत्न केले, मात्र कसल्याही प्रकारचा फरक पडला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या बैठकीत तसा ठराव करण्यात आला. पण असला ठराव ग्रामसभेतघेतल्याशिवाय पारित होणार नाही अशी कायदेशीर अडचण आली. त्यामुळे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. येणारी पिढी बरबाद होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी होकार दिला. 20 जानेवारी रोजी ग्रामसभा झाली आणि सर्वानुमते हा ठराव पारित झाला .


आता संपुर्ण गावात दारू पिण्यास बंदी आहे . दुकानात सिगारेट, बिडी, गुटखा, तंबाखुची विक्रीला बंदी, व्यसन करताना कोणी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचं ग्रामसभेत ठरलं आहे. त्यानुसार गुटखा विकल्यास अन्न औषध प्रशासनाला माहिती देऊन कारवाई केली जाणार आहे. दारू पिल्यास शासकिय योजनाचा लाभ मिळणार नाही. हा निर्णय झाल्यानंतर अनेकांनी आपल व्यसनं सोडलंय .सुरुवातीला काही त्रास झाला पण आता काही वाटत नाही असं गावकरी म्हणत आहेत. गावातील तरूण पिढीसाठी हा निर्णय योग्य असल्याने आपण पण व्यसनाचा त्याग केल्याचे गावकरी सांगतात. सध्या या गावात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू असून गाव जिल्ह्यात चर्चेत आलय.

Post a Comment

Previous Post Next Post