जगातला विषारी शासक; ज्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवताच स्त्रियांना यायचा मृत्यू



जगात पुर्वीच्या काळात असे अनेक राजे होते ज्याच्याबद्दल (Mughal Kings) जाणून घेण्याची उत्सुकता आजही अनेक इतिहास संशोधकांना असते.

त्यांचे राहणीमान कसे होते? त्यांचा आहार, वेशभुषा, नातेसंबंध, त्यांचे वागणेबोलणे, स्वभाव आणि अशा अनेक गोष्टी, ज्यांच्याबद्दल अनेकांना आजही जिज्ञासा आहे. आज आपण अशाच एका राज्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याची ख्याती जगभरात सर्वात विषारी शासक (Most Poisonous Ruler in India) म्हणून होती. असं म्हणले जायचे की या राज्यासोबत जी कोणी स्त्री शारीरिक संबंध (Physical Relationships) ठेवायची तिचा मृत्यू व्हायचा. एवढेच नाही तर त्यांच्या अंगावर बसलेली माशीही जिवंत राहत नसे. त्याच्या जेवणात नाश्त्याला आणि जेवणात पंचपक्वानं आणि सागरसंगीत पकवानं असायची परंतु तरीही तो विष प्राशन करून जिवंत राहिला होता. (Most Poisonous Ruler Sultan Mahmud Begada or Mahmud Shah I used to consume poison who was he and why he had this habit read this full article)

या राजाचे नावं होते मुगल शासक मोहम्मद (महमूद) बगदा. त्याचा जन्म 1445 मध्ये झाला होता. ज्याला मोहम्मद शहा या नावानंही ओळखले जायचे. हा गुजरात (Gujrat King) स्थित राजा होता जो वयाच्या 13 व्या वर्षीच गादीवर आला होता. हा कोणी सामान्य शासक नव्हता. या व्यक्तीची सवयी पाहाल तर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. या मुघल शासकाला जगातील सर्वात विषारी शासक मानले जाते. त्याच्या खाण्यापिण्याच्या आणि राहायच्या सवयी अत्यंत भीषण होत्या. त्याला कोणी खाताना पाहिले की त्यांच्या आजूबाजूला उभी राहणारी, बसलेली लोकंही थरथर कापायची. तो जेवणातून रोज न चूकता विष प्राशन करायचा. महमूद बगदा उर्फ महमूद शहाच्या (Saltun Mahmud Consuming Poison) या भयंकर सवयीमुळे लोकं त्याला प्रचंड घाबरायचे. एवढंच काय त्याचे जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवारही घाबरायचे.

'हा' सुलतान रोष विषप्राशन का करायचा?

प्रचलित कथांनूसार, हा सुलतान महमूद बगदा, लहानपणापासूनच विषप्राशन करत असते. त्यामुळे त्याचे शरीर अत्यंत विषारी झाले होते. त्याचा खुराकही मोठा होता. तो अगदी तामझाममध्ये जेवत असे. त्याला खाण्याची वेड्यासारखी आवड होती. तो एकाच वेळी 35 किलोचं जेवण जेवायचा. (Food of Sultan Mahmud Begada) त्याला भुकही खूप लागत होती. त्याचा खुराक दररोज 35 किलो जेवणाचा असायचा. तो झोपेतही खूप खात असे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्या पलंगाच्या शेजारीही वेगवेगळे खाद्यपदार्थ ठेवलेले असायचे.

नेमकं काय होतं विषप्राशन करण्याचे कारण?

पोर्तुगीज प्रवासी बाबोसा याच्या 'द बुक ऑफ ड्युरेट बाबोसा खंड 1 आणि 2' (The Book of Durate Babosa Volume 1 & 2) या पुस्तकातून या प्रसंगाचा उल्लेख करण्यात आला आहे. महमूद हा लहानपणीचं गादीवर आला होता. त्यामुळे शत्रूपक्षाकडून त्याला जीवे मारण्याची धमकीही येत असे. त्याला मारण्यासाठी अनेकांना कटकारस्थानं रचली होती. त्याला अनेकदा जीवे मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. त्यातून अशा एका वेळी त्याच्या जेवणातून विष देऊन त्याला मारण्याचा कट रचला होता त्यातून तो कसाबसा वाचला परंतु त्यानंतर त्याला अशी भिती असावी की परत त्याच्यावर कोणीतरी असाच हल्ला करेल त्यासाठी त्यानं दररोज जेवणातून न चुकता विष प्राशन करायला सुरूवात केली होती.

त्या यासाठी विविध प्रयोगही केले होते. त्यातून त्याच्या शरीरावर त्याचा परिणाम होणार नाही असा त्याचा समज होता. याच सवयीनं आपला मृत्यू होणार नाही असा त्याचा समज होता. अशाप्रकारे न चुकता विष प्राशन करणारा महमूद शहा वयाच्या 66 व्या वर्षी मृत्यू पावला.

Post a Comment

Previous Post Next Post