आधी करार, मग लग्न! आंबेगावात 6 अटींसह पार पडला आगळावेगळा विवाह सोहळा



लग्न म्हणजे दोन जिवांचे आणि कुटुंबांचेही मिलन असते. सध्या अनेक जण लग्न पारंपरिक पद्धतीनेच पण सोहळा थोडा हटके पद्धतीने करताना दिसतात. आपल्या लग्नाचा सोहळा प्रत्येकाच्या लक्षात रहावा यासाठी खास प्रयत्नही केला जातो.

सध्या एका अशाच हटके विवाह सोहळ्याची चर्चा आहे.

पुण्यातील आंबेगाव येथे नवरीने आणि नवरदेवाने एकमेकांना सहा अटी घातल्या आणि मगच गळ्यात माळा घातल्या. या अटी ऐकूण सगळे वऱ्हाडी आश्चर्यचकीत झाले. विशेष म्हणजे या अटींचे त्यांनी पोस्टरही बनवले. याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

शासकीय, महसूल यासह विविध विभागात अनेक प्रकारे करारनामे केले जातात, मात्र लग्नात केलेला करारनामा ऐकले की नवल वाटणारच. कारण लग्न म्हटले की नवरदेव आणि नवरी यांचे एक नवे आयुष्य सुरू होते. नवदाम्पत्य नव्या आयुष्याच्या सुखी संसाराची स्वप्न पाहतात. मात्र ही स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी एकमेकांना समजून घेणेही तितकेच महत्वाचे असते. असे एकमेकांना समजून घेत आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील मुलगा कृष्णा लंबे आणि जुन्नरच्या नारायणगावची मुलगी सायली ताजणे यांचा विवाह सोहळा मंचर येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात संपन्न झाला.

कृष्णा आणि सायलीच्या या विवाह सोहळ्यात अगळावेगळा करारनामा करण्यात आला. यावेळी नवरा मुलगा मुलगी आणि साक्षीदार म्हणून मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांनी स्वाक्षरी केलीय. लग्नाच्या बंधनात अडकत असताना नवविवाहित दामप्त्यांना एकमेकांकडुन असणाऱ्या आपेक्षा या लग्नच्या करारनाम्यामध्ये घेण्यात आल्या आहेत. हा करारनामा करून तो विवाह स्थळ ठिकाणी लावला होता.

येणारे जाणारे पाहुणे, वऱ्हाडी मंडळी करारनामा पाहत त्यांचे कौतुक करत होते. हे नवदाम्पत्य उच्चशिक्षित असून त्यांचा प्रेम विवाह झाला आहे. या करारनाम्यातून या नवरा, नवरिने एकमेकांच्या आई-वडिलांना सांभाळण्याचा, वाद झाल्यास तो तात्काळ मिटवण्याचा, एकमेकांच्या मित्रांना मानसन्मान देण्याचा एक सामाजिक संदेश दिला आहे. या करारनामामध्ये त्यांनी खालील प्रकारे करार केला आहे.

लग्नाचा करारनामा

1. कृष्णा - सायलीचे म्हणणे नेहमी बरोबरच असेल.
2. सायली - मी कृष्णाकडे शॉपींग साठी हट्ट धरणार नाही.
3. सायली - मी कृष्णाला मित्रांबरोबर फिरायला, पार्टीला जायला आडवणार नाही. (महिन्यातून दोन वेळा)
4. कृष्णा - मी सायलीची आणि आई-वडिलांची ही सेवा करेल
5. सायली - मी कृष्णाचे मित्र घरी आल्यानंतर त्याच्यासाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवेल.
6. आमच्यात वादविवाद झाले तरी ते आमचे आम्ही एक दिवसात मिटवू.

Post a Comment

Previous Post Next Post