उद्धव ठाकरे यांना धक्का नसून काही अंशी दिलासा ; उज्ज्वल निकम यांचे मत.


दिनेश बनकर कार्यकारी संपादक
सुपर फास्ट बातमी ७८२२०८२२१६
मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्ता संघर्ष सर्वश्रुत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केले. मात्र, उद्धव ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देण्यात यावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दिली. त्यावर आज सुनावणी झाली असून सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या निकालास स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तर सादर करण्याची नोटीस सुप्रीम कोर्टाने दिली आहे. ठाकरे गटाच्या मागणीला स्थगिती न मिळाल्यामुळे ठाकरे गटाला धक्का बसल्याचा चर्चा आहे. त्याबाबत जेष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी भाष्य केले. ठाकरे गटाला हा धक्का म्हणता येणार नाही, असे ते म्हणाले.
     सुप्रीम कोर्ट यावर स्थगिती देईल, अशी शक्यता नव्हती. नैसर्गिक न्यायदान तत्वानुसार दोन्ही बाजूचे ऐकून घ्यावे लागत असल्यामुळे आठ दिवसांनी सुनावणी ठेवली आहे. निवडणूक आयोग आणि शिंदे यांनी उत्तर सादर केल्यानंतर दोन्ही बाजूचे ऐकून न्यायालय निर्णय घेऊ शकेल. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ठाकरे गटाच्या वकिलांनी जो आक्षेप घेतला आहे. त्यावर उत्तर आल्यावर ठाकरे यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते, हे महत्त्वाचे असेल तरच ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या की, नाही हे स्पष्ट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे यांच्या वकिलाने आम्ही व्हीप काढणार नाही, असे सांगितल्याने स्थगितीचा निर्णय झाला नाही. पण उत्तर सादर करेपर्यंत एक दिलासा आहे. उद्धव ठाकरे यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्ट ठाकरे गटाची याचिका ऐकणार आहे. त्यामुळे स्थगिती मिळाली नसली तरी आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार नाही, हीदेखील ठाकरे गटासाठी महत्वाची बाब आहे. त्यामुळे पुढील आठवड्यातील सुनावणीत काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, असे उज्ज्वल निकम म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post