पोद्दार इंटरनॅशनल स्कूल भंडाराच्या दोन विद्यार्थ्यांची अवकाश प्रक्षेपणात गगण भरारी* *ता.भंडारा*



तालुका प्रतिनिधी संजय मानकर

 *भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन च्या वतीने एपीजे अब्दुल कलाम सॅटलाईट लॉन्च व्हेईकल मिशन 2023 च्या माध्यमातून कलाम सरांच्या स्वप्नपूर्तीचे उद्दिष्ट समोर ठेवून विद्यार्थ्यांनी बनविलेले हायब्रीड राकेट व 150 पिको सॅटेलाइट दिनांक 19 फरवरी 2023 रोज रविवारला तामिळनाडू राज्यातील पट्टीपुलम येथून प्रक्षेपित केले गेले आणि जागतिक कीर्तीमान प्रस्थापित झाला.*



         *या प्रक्षेपण कार्यक्रमाला आंधप्रदेशच्या राज्यपाल व पॉंडिचेरी च्या उपराज्यपाल डॉक्टर श्रीमती तामिलीसाई सुंदरराजन यांचे सह स्पेस झोन इंडियाचे तरुण शास्त्रज्ञ आनंद मेघलिंगम, मार्टिन ग्रुप चेन्नईचे एम.डी. मार्टिन जोसेफ, एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे फाउंडर एपीजे एमजे शेख सलीम, इसरो चे माजी संचालक पद्मश्री डाॅं.एम.अन्नादुराई,स्पेस झोन चे सेक्रेटरी मिलिंद चौधरी, महाराष्ट्र समन्वयक मनीषाताई चौधरी उपस्थित होते.
        *150 PICOसॅटेलाईट लांचींग 2023 उपक्रमाची विशेषत:म्हणजे हे 150 PICOसॅटेलाईट विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत तयार करण्यात आले आहेत.यातील 10 PICO सॅटेलाईट नागपूर येथील कार्यशाळेत बनविण्यात बनविण्यात आले. या कार्यशाळेत तथा पट्टीपुलम राज्य-तामिलनाडू प्रक्षेपणात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल भंडारा चे दोन विद्यार्थी प्रतिक विलास दिघोरे व पराग विलास दिघोरे सहभाग घेतला होता. त्यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.*   

 या उपक्रमांद्वारे हवामानातील आर्द्रता, वाऱ्याचा वेग, तापमान अशा विविध घटकांचा अभ्यास करण्यासाठी हे उपग्रह उपयोगी पडणार आहे. उपग्रहांनी जमा केलेली संपूर्ण माहिती विशेष अध्ययनासाठी शासनाच्या विविध विभागांना पुरविली जाणार आहे
       या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन, आणि स्पेस झोन इंडिया कडून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.*तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड,एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे .*
     या उपक्रमासाठी *प्रतिक विलास दिघोरे व पराग विलास दिघोरे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल भंडारा* यांना *प्राचार्य मनी भुषण चौबे सर व धीरज सर ,भारती मॅम, अर्चना मॅम ,सोनल मॅम व प्रशाशक रविंद्र दरवेश्वार सर ,सौ.निलिमा दिघोरे (आई) व विलास दिघोरे (वडील)* प्रत्यक्ष सहकार्य लाभले.
              या यशस्वीतेसाठी सर्व स्तरावरून विद्यार्थ्यांचे कौतूक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post