जिल्हा परिषद केंद्र शाळा आरमोरी ला १०० वर्ष झाल्याच्या अनुसंगाने जी.प.केंद्र शाळा बैच 1986 - 89 कडून वाटर कूलर /आर ओ व ग्लास वर्क शिल्ड भेट


आरमोरी :-:जि. प. केंद्र शाळा आरमोरी या शाळेला यावर्षी १०० वर्षे पुर्ण झाले असून या निमीत्ताने जि. प. शाळेत शताब्दी महोत्सव कार्यक्रम घेण्यात येत आहे. या १०० वर्षाच्या कालावधीत अनेक नामवंत विद्यार्थी या शाळेने घडविले असून देशाच्या विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत.


ज्या शाळेने आपल्याला घडविले त्या पवित्र शाळेसाठी आपल्याला काहीतरी भेट द्यावी या हेतूने शाळेचे माजी विद्यार्थी गडचिरोली जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित सावकार पोरेड्डीवार यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याकरीता पिण्याचे पाणी वॉटर फिल्टर व वॉटर कुलर द्यायची ही कल्पना त्यांनी आपल्या वर्गमित्रांकडे मांडली. सर्व वर्गमित्रांनी या समाजाभिमुख कल्पनेचे स्वागत केले. या माध्यमातून पाण्यातून पसरणाऱ्या आजारापासून शाळेच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे याकरीता १९८६-१९८९ या तत्कालीन बॅच मार्फत शाळेला शताब्दी महोत्सवाची भेट म्हणून वॉटर फिल्टर व वॉटर कुलर दिनांक ०७/०२/२०२३ या रोजी भेट स्वरूपात देण्यात आली. तसेच ग्लासशिल्ड वर्क मध्ये शताब्दी महोत्सवाचे लोगो असलेले स्मृतीचिन्ह भेट देण्यात आली. माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या या उपक्रमाचे सध्या सर्वत्र कौतुक होत असून आपल्या बालपणीच्या शाळेसाठी अशा अनेक समाजाभिमुख भेटवस्तू देऊन आपल्या शाळेप्रती असलेले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन १९८६-८९ या बॅचने केले आहे.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता गणेश बैरवार, नवनाथ कुंभारे, भगवान बन्सोड, अमोल मारकवार, सुशिल खोब्रागडे, सुनिल ठेंगळे, नासीर शेख व इतर वर्गमित्र यांनी परीश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post