वॉशिंग्टनमधील एका दुकानाबाहेर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती"बिल गेट्स" बर्गर ऑर्डर करण्यासाठी रांगेत उभे आहेत.


वॉशिंग्टनमधील एका दुकानाबाहेर "बिल गेट्स" बर्गर ऑर्डर करण्यासाठी रांगेत उभे आहेत.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती पैकी आणि सर्वात जास्त मोठी धर्मादाय संस्था चालवणारे व्यक्ती म्हणून बिल गेट्स जगाला परीचित आहेत.

यांच्या बरोबर ना सशस्त्र पहारेकरी ना बाऊंसर्स ना सोबत मोठा वाहनांचा ताफा, कुठलाही सुरक्षा प्रोटोकॉल नाही आपल्या इथल्या सारखी झेड सिक्युरिटी नाही. 

 हे संपूर्ण बर्गरचे दुकान ते विकत घेऊ शकतात. ज्यांच्या एका इशाऱ्यावर जगातील कुठलीही गोष्टी हजर होऊ शकते , तरीही सभ्यता आणि नम्रतेची मूर्ती म्हणजे बिल गेट्स महाशय. 

ना यांनी रांग मोडली ना यांच्या पुढच्या लोकांना बाजूला काढले गेले ना यांची ऑर्डर अगोदर स्विकारली गेली. 

तत्त्वांना चिकटून राहणे, प्रामाणिकपणा, आणि कठोर परिश्रम हे या लोकांच्या प्रगतीचे रहस्य आहे. बिल गेट्स यांच्या सारख्या व्यक्तींमध्ये असे असाधारण गुण असतात, ज्यामुळे ते विशेष व्यक्तींच्या श्रेणीत मोडतात.

Post a Comment

Previous Post Next Post